Shocking News: ऐकावं ते नवलच! बायकोने नवऱ्याचं लग्न आपल्या बहिणीसोबत लावून दिलं; कारण ऐकून चक्रावून जाल!

Wife Arranged Husband Marriage With her Sister: एका पत्नीने आपल्या पतीचा विवाह आपल्याच लहान बहिणीसोबत लावून दिला आहे.
wife arranged the husband marriage with her sister
wife arranged the husband marriage with her sisterSaam TV
Published On

Wife Arranged Husband Marriage With her Sister: आतापर्यंत तुम्ही पती, पत्नी आणि वो असे अनेक किस्से ऐकले किंवा वाचले असतील. दोघांमध्ये तिसऱ्याची एन्ट्री झाली की, संसारा मोडतात. त्यानंतर भांडणं कोर्ट-कचेरी, घटस्फोटासारखे विषय घडतात. पण सध्या सोशल मीडियावर एका अनोख्या लग्नाची चर्चा सुरू आहे. एका पत्नीने आपल्या पतीचा विवाह आपल्याच लहान बहिणीसोबत लावून दिला आहे.

wife arranged the husband marriage with her sister
Pune Crime: मामाच्या मुलीसोबत लग्न, १० वर्षांचा सुखी संसार; शांत स्वभावाच्या डॉक्टरने अख्खं कुटुंब का संपवलं?

उत्तरप्रदेशातील (Uttar Pradesh) प्रयागराज जिल्ह्यातील शंकरगड परिसरात हा प्रकार घडला आहे. विशेष बाब म्हणजे या लग्नाला कुणाचाही विरोध नव्हता. लग्नाला नवरा मुलगा आणि मुलीकडील सर्व मंडळी उपस्थित होते. सगळ्यांना हैराण करायला लावणारा आणि विचित्र अशा विवाह सोहळ्याची सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगली आहे. आजतकने याबाबतचं वृत्त दिलं आहे.

राजकुमार असं या विवाहित तरुणाचं नाव असून तो प्रयागराजमधील शंकरगड परिसरातील रहिवाशी आहे. मिळालेल्या माहितीनुसार, राजकुमार हा मजुरी करत पोट भरतो. त्याचं लग्न रुमी नावाच्या एका तरुणीशी झालं होतं. रुमीचं आपल्या बहिणीवर खूप जीव होता.

बहिणीचं लग्नही (Marriage) थाटामाटात व्हावं अशी तिची इच्छा होती. मात्र, घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची असल्याने बहिणीचे पुढे काय होणार? याची चिंता तिला लागली होती. बहिणीचं लग्न करण्यासाठी तिच्याकडे पैसे देखील नव्हते. म्हणून रुमीने आपल्या लहान बहिणीचं लग्न पतीसोबत लावण्याचा निर्णय घेतला.

wife arranged the husband marriage with her sister
Pune Crime News: आंबेगावमध्ये विवाहित महिलेवर प्रियकराच्या ४ मित्रांकडून सामूहिक अत्याचार; जंगलात भेटायला गेल्यावर घडलं भयंकर

रुमीने पतीला (Husband and Wife) कसंबसं करुन आपल्या छोट्या बहिणीशी लग्न करायला तयार केलं. तिघेही मंदिरात पोहोचले. दोघांकडील मंडळी सुद्धा मंदिरात पोहचली. मग काय बायकोनेच आपल्या बहिणीचं लग्न नवरा राजकुमार याच्यासोबत लावून दिलं. लग्नानंतर दोन्ही बायकांना घेऊन राजकुमार घरी आला.

या लग्नाने राजकुमारची पहिली बायको जाम खूश आहे. शिवाय आता बहिणीच्या लग्नाची चिंता नसल्यानं रुमीचा सगळा ताणही हलका झाला आहे. पण गावातच नव्हे तर अख्ख्या देशात या लग्नाची तुफान चर्चा रंगली आहे. आता रुमी आणि तिचा नवरा राजकुमार आणि रुमीच्या नवऱ्याची बायको म्हणजेच तिची लहान बहिण हे तिघेही सुखी संसार करतील, एवढीच अपेक्षा अनेकांना लागून आहे.

Edited by - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com