Delhi News: देशात जातनिहाय जनगणना झाली तरच ओबीसी समाजाला आपले हक्क मिळतील आणि तेव्हाच आपल्या देशाची सहिष्णू, सौहार्दपूर्ण, धर्मनिरपेक्ष देश म्हणून प्रतिमा कायम राहील असे सांगत देशात जोपर्यंत जातनिहाय जनगणना होत नाही तोपर्यंत आपला लढा निकराने सुरू ठेवावा लागेल असे प्रतिपादन अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नेते छगन भुजबळ यांनी केले.
देशाचे माजी पंतप्रधान स्व.व्ही.पी सिंह यांच्या जयंतीनिमित्त दिल्लीच्या कॉन्स्टिट्यूशन क्लबमध्ये छगन भुजबळ यांच्या प्रमुख उपस्थितीत "सामाजिक न्यायाचा वारसा" हा कार्यक्रम पार पडला. या प्रसंगी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. (Maharashtra Political News)
काय म्हणाले छगन भुजबळ...
यावेळी बोलताना छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी "व्ही.पी सिंह जयंती साजरी करण्यासाठी आज इथे उभा राहिल्याचा मला अभिमान वाटतो. आज व्ही. पी. सिंह यांची जयंती आहे मात्र त्यांचे योगदान लोकांना का आठवत नाही हा मोठा प्रश्न आहे. मागास समाजातील लोक त्याला का विसरले," हा चर्चेचा विषय असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.
तसेच देशाच्या पंतप्रधान पदावर स्व. व्ही.पी.सिंह यांनी केवळ ११ महिने कारभार केला. परंतु याच काळात त्यांनी हजारो वर्षांपासून मागासलेल्या लोकांवर होत असलेला अन्याय दूर करण्यासाठी महत्वाची पावले उचलल्याचेही त्यांनी सांगितले.
ते म्हणाले की, "सरकार इम्पेरिकल डेटासाठी सर्व नागरिकांचे जात आणि आर्थिक सर्वेक्षण करण्यास तयार नाही.न्यायालयांनीही राज्यांना अशी जनगणना करण्यास मनाई केली आहे. आता २०३१ पर्यंत जनगणनाही पुढे ढकलण्यात येणार असल्याच्या बातम्या येत आहेत. समतेवर विश्वास ठेवणाऱ्या नागरिकांनी आतापासून आरक्षणविरोधी लोकांबरोबर संघर्ष करावा लागणार आहे. संपूर्ण देशात जातनिहाय जनगणना झाली पाहिजे, ही मागणी पूर्ण होईपर्यंत हा लढा निकराने सुरू ठेवावा... असे आवाहन त्यांनी केले. (Latest Marathi News)
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.