Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Viral Video: पुण्यात मध्यरात्री रस्त्यावर महिलेचा धिंगाणा, दारूच्या नशेत घातला राडा, व्हिडीओ व्हायरल

Pune Shocking Video: सोशल मीडियावर बऱ्याचदा पुणे शहरातील अनेक घटनांचे व्हिडिओ व्हायरल होत असतात.त्यातच पुन्हा एकदा पुणे शहरातून धक्कादायक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Tanvi Pol

Drunken Woman Video: वानवडी येथील जगताप चौकात एका महिलेने मद्यधुंद अवस्थेत धिंगाणा घातल्याची घटना समोर आली आहे. पुणे स्टेशन परिसरातील सतत सुरू असणाऱ्या काही पब्स मधून ही पार्टी करून आल्याची माहिती प्राथमिक मिळत आहे.

प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, सदर महिला सार्वजनिक ठिकाणी (place)असभ्य वर्तन करत होती. जागेवर गर्दी जमल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण झाला. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी स्थानिक नागरिकांनी पोलिसांना कळवण्याचा प्रयत्न केला.

ललित ससाणे यांनी हा प्रकार उघडकीस आणत पोलीस प्रशासनाला वेळीच कारवाई करण्याची मागणी केली. मात्र, पोलिसांकडून यावर कितपत तत्पर कारवाई झाली याबाबत अद्याप माहिती मिळालेली नाही.

स्थानिक नागरिक आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी या प्रकारावर नाराजी व्यक्त करत सार्वजनिक ठिकाणी शिस्त राखण्याचे आणि पोलिसांनी अशा घटनांवर त्वरित कारवाई (Action)करण्याचे आवाहन केले आहे.

टीप : हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Yavtmal Crime : दोस्त दोस्त ना रहा! संतापलेल्या मित्रानेच जिवाभावाच्या मित्राची केली हत्या, यवतमाळ हादरले

Maharashtra Live News Update : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिवनेरीवर दाखल

Riteish Deshmukh Video : छत्रपतींसमोर नतमस्तक! रितेश देशमुख सकाळी सकाळी पोहचला शिवनेरीवर, म्हणाला...

PM Kisan Yojana: होळीआधी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार ₹२०००; पीएम किसान योजनेच्या २२व्या हप्त्याबाबत अपडेट

Election : सरपंच थेट जनतेतूनच ठरणार! सोलापूरमधील ६५५ ग्रामपंचायतीचा धुरळा उडाला, पाहा वेळापात्रक

SCROLL FOR NEXT