Kalyan Dombivali: 'त्या' ६५ इमारतींवर कारवाई होणारच, शेकडो कुटुंब बेघर होणार

KDMC action on unauthorized buildings: न्यायालयाने आदेश दिल्यानंतर कल्याण डोंबिवलीमधील त्या ६५ इमारतींवर कारवाई होणार असल्याचं केडीएमसी अतिरिक्त आयुक्त योगेश गोडसे यांनी सांगितलंय.
kdmc news
kdmc newsSaam Tv News
Published On

न्यायालयाने आदेश दिल्यानंतर कल्याण डोंबिवली मधील ६५ इमारतींवर कारवाई होणार असल्याचं केडीएमसी अतिरिक्त आयुक्त योगेश गोडसे यांनी सांगितलंय. संबंधित रहिवाशांना इमारत रिकामी करण्याचे सूचना देण्यात आल्या आहेत. पोलिसांच्या मदतीने इमारती रिक्त करत लवकरच इमारत निष्कासन करण्याची कारवाई करण्यात येईल, असं प्रशासनाने स्पष्ट केलंय.

तर दुसरीकडे अनधिकृत इमारतींमध्ये राहणार्‍या रहिवाशांच्याबाबत शासनाचे पुनर्वसनाचे धोरण नसल्यानं त्यांचे पुनर्वसन होऊ शकणार नाही, असं केडीएमसीकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. त्यामुळे या ६५ इमारतींमध्ये राहणार्‍या रहिवाशांवर बेघर होण्याचे संकट कोसळणार आहे.

kdmc news
Pune News: लष्करात नोकरी लावण्याचं आमिष, २ तरूणांना तब्बल ५ लाखांना गंडवलं

कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या अधिकार्‍यांचे खोटे सही शिक्के वापरत कागदपत्रे बनवून महारेराचे प्रमाणपत्र मिळवत शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी कल्याण डोंबिवली मधील ६५ इमारती अनधिकृत ठरवण्यात आल्या होत्या. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने याप्रकरणी पोलीस ठाण्यात संबंधित बिल्डरविरोधात तक्रार दाखल केली होती.

kdmc news
Nashik News: कोयता, कुऱ्हाड अन् रक्ताच्या थारोळ्या; भावकीच्या वादातून दोन गटात राडा, एकाचा मृत्यू, १३ जण जखमी

याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात असून, याचा तपास सुरू आहे. तर, दुसरीकडे न्यायालयाने या इमारती निष्कासित करण्याचे आदेश दिले आहेत. या इमारीतींमध्ये राहणार्‍या कुटुंबासमोर घरांचा प्रश्न निर्माण झाला आहे. याबाबत रहिवाशांनी 'आमच्या घरांवर कारवाई करता, मात्र आमची फसवणूक केलेली आहे, त्या बिल्डवर आणि संबंधित अधिकारी यांच्यावर कारवाई कधी कराल? असा प्रश्न उपस्थित करत आहेत.

या रहिवाशांनी 'आमची फसवणूक झाली आहे लाखो रुपये देऊन आम्ही घर विकत घेतले आहे. या घरांसाठी आम्ही कर्ज देखील काढले आहे. त्यामुळे आधी आमच्या पुनर्वसनाची सोय करा', अशी मागणी रहिवाशांनी केली आहे. याबाबत सुप्रीम कोर्टात दाद मागणार असल्याचंही रहिवाशांनी सांगितलं.

याबाबत कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त योगेश गोडसे यांनी या इमारती रिकामी करून इमारतींवर सक्तीने कारवाई करण्यात येईल, रहिवाशांना स्थलांतरित करण्यासाठी पोलिसांच्या मदतीने प्रयत्न सुरू आहेत. या इमारती रिक्त करत त्या पाडण्यात येतील असे सांगितले.

दरम्यान, या इमारती अनधिकृत असल्यामुळे शासनाचे अनधिकृत इमारतींमध्ये राहणार्‍या रहिवाशांसाठी कोणतेही धोरण नाही. त्यामुळे रहिवाशांचे पुनर्वसन करता येणार नसल्याचं स्पष्ट केले आहे. तर याप्रकरणी महापालिकेची फसवणूक करणाऱ्या विरोधात पोलिसांकडे गुन्हा दाखल करण्यात आलाय. त्याचा तपास देखील सुरू असल्याचे गोडसे यांनी सांगितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com