दहा दिवसांच्या पाहुणचारानंतर भक्तांचा लाडका गणराया आज निरोप घेत आहे. देशभरात गणपती विसर्जन मिरवणुकांची जंगी तयारी आणि जल्लोष पाहायला मिळत आहे. विसर्जन मिरवणुकांमध्ये अतिउत्साही तरुणांकडून हुल्लडबाजीचे प्रकारही समोर येत असतात. उत्तरप्रदेशमध्ये असाच एक प्रकार समोर आला असून याचा व्हिडिओ सध्या माध्यमांवर व्हायरल होत आहे.
विसर्जन मिरवणूकीचा देशभर जल्लोष....
देशभरात आज गणपती विसर्जनाचा (Ganeshotsav 2023) जल्लोष अन् उत्साह पाहायला मिळत आहे. त्याआधी देशातील विविध भागात दीड, पाच आणि सात दिवसांच्या गणपतीचे वाजतगाजत विसर्जन केले. अलोट गर्दी आणि तरुणांच्या उत्साही वातावरणात या मिरवणुका पार पडल्या.
मिरवणुकांदरम्यान काही हुल्लडबाजीचे प्रकारही समोर आले. सध्या उत्तरप्रदेशमधील (Uttar Pradesh) एक व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल (Viral Video) होत आहे. या व्हिडिओमध्ये मिरवणूक सोडून तरुण एका ट्रॅक्टर चालकाला बेदम मारहाण करताना दिसत आहेत.
मिरवणूकीत ट्रॅक्टर घुसला...
त्याचं झालं असं की, उत्तर प्रदेशच्या गाजियाबादमध्ये गणपती विसर्जनाची मिरवणूक अगदी जल्लोषात आणि डॉल्बीच्या दणदणाटात सुरू होती. रस्त्यावरुन सुरू असणाऱ्या मिरवणुकीत तरुण बेभान होऊन नाचत होते. अशातच एक अनियंत्रित ट्रॅक्टर या मिरणुकीत शिरतो आणि काही दुचाकींना फरफटत घेवून जातो.
चालकाला बेदम मारहाण....
या प्रकारानंतर मिरवणुकीत एकच गोंधळ उडतो. ज्यानंतर काही तरुण ट्रॅक्टर चालकाला मारहाण करायला लागतात. ट्रॅक्टर चालकाला खाली उतरवुन रस्त्याच्या मधोमध लाथा- बुक्क्यांनी बेदम मारहाण करत असल्याचे या व्हिडिओमध्ये दिसत आहे.
वाहतुक खोळंबली...
रस्त्याच्या मधोमध हा सगळा राडा झाल्याने वाहतुकीचाही खेळखंडोबा होतो. काही वेळाने पोलिसांना याबाबत माहिती देताच ज्यानंतर ही संपूर्ण परिस्थिती नियंत्रणात येते. या धक्कादायक घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
संतप्त प्रतिक्रिया...
व्हिडिओ समोर आल्यानंतर नेटकऱ्यांनी चांगलीच शाळा घेतली असून अशा हुल्लडबाज तरुणांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे, तर काही जणांनी ट्रॅक्टर चालकाची चुक असल्याचेही म्हणले आहे. (Latest Marathi News)
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.