Rajasthan Car Accident Saamtv
व्हायरल न्यूज

Car Accident Video: बर्निंग कारचा थरार! अपघातानंतर गाडी पेटली; ३ मित्रांचा मृत्यू; थरकाप उडवणारा VIDEO

Rajasthan Car Accident: राजस्थानच्या अजमेरमध्ये भरधाव कार दुभाजकाला धडकून भीषण अपघात झाला. या अपघातानंतर गाडीने पेट घेतला, ज्यामध्ये तिघांचा होरपळून मृत्यू झाला असून दोन जण गंभीर जखमी झालेत

Gangappa Pujari

Rajasthan Ajmer Accident:

राजस्थानमधून भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. राजस्थानच्या अजमेरमध्ये भरधाव कार दुभाजकाला धडकून भीषण अपघात झाला. या अपघातानंतर गाडीने पेट घेतला, ज्यामध्ये तिघांचा होरपळून मृत्यू झाला असून दोन जण गंभीर जखमी झालेत. शनिवारी (१६, डिसेंबर) रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास ही घटना झाल्याचे सांगण्यात येत आहे.

राजस्थानमधील (Rajasthan) अजमेर शहरात शनिवारी रात्री भयंकर अपघाताची घटना घडली. स्थानिकाने दिलेल्या माहितीनुसार, दिल्ली क्रमांकाची भरधाव कार झनाना रोडवरील डिव्हायडरला धडकली आणि त्यानंतर गाडीने पेट घेतला. गाडीला आग लागल्याचे पाहताच स्थानिक लोकांनी धाव घेत गाडीच्या काचा फोडून तरुणांना बाहेर काढले.

अपघातावेळी (Accident) गाडीमध्ये पाच जण होते. ज्यामधील दोघांचा गाडीतच मृत्यू झाला होता. तर एकाचा उपचारासाठी नेत असताना दुर्दैवी मृत्यू झाला. अपघातात जखमी झालेल्या दोघांना सध्या जवाहरलाल नेहरू रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतले.

कबीर सिंग आणि जय सांखला आणि सोहेल खान अशी या अपघातात मृत्यू झालेल्या तरुणांची नावे आहेत. तर लोहखान येथील रहिवासी कृष्णा मुरारी आणि गुर्जर धरती येथील उमेश कुमार या दोघांवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, गाडीने पेट का घेतला याबाबतचे कारण अद्याप समोर आले नसून पोलीस याबाबतचा अधिक तपास करत आहेत. (Latest Marathi News)

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Rain Live News : उल्हास नदीवरील पूल पाण्याखाली; महामार्ग वाहतुकीस बंद

Jalgaon : अंगावर काटा आणणारी घटना! विजेचा शॉक लागून एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू

Chief Minister Salary : राज्याच्या मुख्यमंत्र्यांना किती पगार मिळतो?

Madison Square Garden: न्यूयॉर्कमधील मॅडिसन स्क्वेअर 'भारत माता की जय' आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयघोषाने दुमदुमलं

Nandurbar : बस कंडक्टरकडून विद्यार्थिनींना शिवीगाळ; नंदुरबार बसस्थानकावरील प्रकार, कारवाईची मागणी

SCROLL FOR NEXT