Vande Bharat Express: संत नगरी शेगावसाठी धावणार वंदे भारत; मुंबई व पुण्यातील भक्तांसाठी होणार सुविधा

Buldhana News : रेल्वे प्रशासन व सरकारकडून मे २०१४ पर्यंत देशातील लोकप्रिय तीर्थक्षेत्र आणि पर्यटन स्थळांना जोडणाऱ्या ३५ वंदे भारत एक्सप्रेस चालवण्याच्या योजनेवर काम सुरु आहे
Shegaon Vande Bharat Express
Shegaon Vande Bharat ExpressSaam tv
Published On

संजय जाधव 

बुलढाणा : विदर्भाची पंढरी असलेल्या शेगाव येथील संत गजानन महाराजांच्या देवस्थानाला भेट देणाऱ्या भाविकांचा (Shegaon) प्रवास आरामदायी व जलद होणार आहे. यासाठी आता लवकरच मुंबई ते शेगाव आणि पुणे ते शेगाव अशा दोन वंदे भारत ट्रेन चालवण्याचा निर्णय होण्याची शक्यता बळावली आहे. (Live Marathi News)

Shegaon Vande Bharat Express
Rabi Crops : बीड जिल्ह्यात रब्बीच्या ८६ टक्के पेरण्या; ज्वारी आणि हरभऱ्याचा अधिक पेरा

रेल्वे प्रशासन व सरकारकडून मे २०१४ पर्यंत देशातील लोकप्रिय तीर्थक्षेत्र आणि पर्यटन स्थळांना जोडणाऱ्या ३५ वंदे भारत एक्सप्रेस चालवण्याच्या योजनेवर काम सुरु आहे. यानुसार रेल्वेने प्रस्तावही मागवला आहे. त्यानुसार (Buldhana) प्रस्ताव पाठविण्यात आले आहे. त्यामुळे आता लवकरच मुंबई आणि पुण्यातील संत गजानन महाराजांच्या भक्तांना जलद व सुखकारक प्रवास वंदे भारत ने करता येणार आहे. याबाबत शिक्कामोर्तब होण्याची शक्यता देखील वर्तविली जात आहे. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Shegaon Vande Bharat Express
Dombivali MIDC: डोंबिवली एमआयडीसी प्रशासनाचा निषेध; नागरिकांची रस्त्यांसाठी मुक निदर्शने

दोन्ही ठिकाणचे प्रस्ताव 

५५४ किलोमीटर अंतराच्या मुंबई ते शेगाव आणि ४७० किलोमीटरच्या पुणे ते शेगाव रेल्वे मार्गावर वंदे भारत ट्रेन चालवण्याचा प्रस्ताव रेल्वे बोर्डाकडे पाठविण्यात आला असल्याची माहिती रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे. या प्रस्तावावर विचार होऊन लवकरच यावर होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.  

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com