Viral Video Saam TV
व्हायरल न्यूज

Viral Video: शिमला मिरची कापताच बाहेर आला धाग्यासारखा किडा; व्हिडिओ पाहून भाजी खाताना १० वेळा विचार कराल

Shimla Mirch Viral Video: शिमला मिरचीच्या भाजीचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. यामध्ये एक महिला शिमला मिरची नेहमीप्रमाणे कापत आहे. भाजी अगदी मधोमध आपल्यावर या महिलेला यामध्ये एक धागा दिसतो.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

शिमला मिरची ही अशी भाजी जी बाजारात स्वस्त मिळते आणि तिची रेसिपी देखील एकदम सहज सोप्पी आहे. त्यामुळे अनेक व्यक्ती आठवड्यातून एकदा तरी शिमला मिरचीची भाजी खातात. काही व्यक्तींना ही भाजी फार आवडते. तुम्हाला देखील शिमला मिरचीची भाजी जास्त आवडत असेल तर आधी हा व्हिडिओ पाहा.

सोशल मीडियावर शिमला मिरचीच्या भाजीचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. यामध्ये एक महिला शिमला मिरची नेहमीप्रमाणे कापत आहे. भाजी अगदी मधोमध कापल्यावर या महिलेला यामध्ये एक धागा दिसतो. तो धागा ती बाहेर काढते तेव्हा तो स्वत:च हालू लागतो. महिला धागा निट पाहते तेव्हा लक्षात येतं की हा धागा नाही तर एक वेगळ्या प्रकारचा किडा आहे.

त्यामुळे या महिलेने या भाजीचा व्हिडिओ आपल्या फोनमध्ये रेकॉर्ड केला आहे. शिमला मिरचीच्या भाजीचा हा व्हिडिओ आता सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. हा एक थ्रेड किडा आहे. जो पोटात गेल्यानंतर तुमच्या मासपेशी खाण्यास सुरुवात करतो. यामुळे एखाद्या व्यक्तीचा मृत्यू देखील होऊ शकतो, असा दावा व्हिडिओमध्ये करण्यात आला आहे.

बाजारात विविध प्रकारच्या भाज्या मिळतात. फास्ट फूड खाण्यापेक्षा निरोगी राहण्यासाठी आहारात जास्तीत जास्त भाज्यांचा समावेश करावा असं डॉक्टर देखील सांगतात. त्यामुळे आपण जास्त प्रमाणात भाज्या खातो. मात्र सध्याच्या युगात सर्व भाज्या आणि फळ देखील विविध रसायने आणि केमिकल वापरून बनवली जातात. त्यामुळे त्यामध्ये जिवनसत्व कमी आणि धोकादायक किडे तयार होण्याची शक्यता असते.

भाज्या घरी आणल्यावर ही काळजी घ्या.

भाज्यांमध्ये केमिकलचा वापर केला जातो. त्यामुळे आपण प्रत्येक व्यक्तीला याबाबत जाब विचारू शकत नाही. मात्र भाजी आणल्यावर ती लगेचच फ्रिजमध्ये ठेवू नका. भाजी स्वच्छ धुवून घ्या. त्यानंतर ती व्यवस्थीत साफ करा. भाजी साफ करताना त्यात काही किटक आहेत का? हे देखील तपासून घ्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Food Digestion: खाल्लेले अन्न पचायला किती वेळ लागतो?

Farali Misal Recipe : झणझणीत फराळी मिसळ, उपवासाला एकदा करून तर बघा

Rain Alert : वाशिम जिल्ह्यात तीन दिवस मुसळधार पावसाचा इशारा; अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस

Maharashtra Live News Update : बीडमध्ये क्लासेसमधील मुलींचे लैंगिक छळ प्रकरण; दुसरा गुन्हा दाखल

Harbour Line : हार्बर मार्गावरील रेल्वे वाहतूक विस्कळीत; रविवारच्या दिवशी प्रवाशांचे मेगा हाल

SCROLL FOR NEXT