Hatras Stampede Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Hatras Stampede Viral Video: हाच तो व्हिडिओ, इथंच झाली चेंगराचेंगरी; हाथरस सत्संगात नेमकं काय आणि कसं घडलं?

Up Hatras Stampede : उत्तर प्रदेशच्या हाथरस येथे मंगळवारी (ता. ३ जुलै) दुपारच्या सुमारास मोठी दुर्घटना घडली. भोलेबाबांच्या सत्संग कार्यक्रमासाठी आलेल्या भाविकांमध्ये चेंगराचेंगरी झाली.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सध्या उत्तर प्रदेशातील हाथरस घटनेने संपूर्ण देश हादरुन गेला आहे. उत्तर प्रदेशच्या हाथरस जिल्ह्यात भोले बाबाच्या सत्संगदरम्यान मंगळवारी झालेल्या भीषण चेंगराचेंगरीत अनेक भाविक ठार झाले. या मृतांमध्ये मोठ्या प्रमाणात महिला आणि लहान मुलांचाही समावेश आहे. आता पर्यंत १२० जणांचा मृत्यू झाला आहे आहे तर अनेक व्यक्ती जखमी झाले आहेत.

कधी घटना घडली?

उत्तर प्रदेशच्या हाथरस येथे मंगळवार( ता.३ जुलै) दुपारच्या सुमारास ही दुर्देवी घटना घडली. जो सत्संग हाथरसमधील फुलरई मुगलगढी येथे नारायण विश्व हरी भोले बाबा यांच्या सत्संगाचं आयोजन करण्यात आले होते. ज्यासाठी हाथरसमध्ये संपूर्ण भाविक आले होते. या कार्यक्रमाला लाखों भाविकांची गर्दी झाली होती.

मात्र सत्संगमध्ये बाबांच प्रवचन झाल्यानंतर बाबांच्या पदस्पर्श दर्शनासाठी एकाच वेळी लाखों भाविकांची झुंबड उडाली आणि या सर्व प्रकारातून ही संपूर्ण चेंगराचेंगरी झाली असे समजण्यात येत आहे. जेव्हा लाखोंच्या संख्येने असलेले भाविक एकाच वेळी पदस्पर्श दर्शनासाठी जात होते, तेव्हा भाविकांमध्ये चेंगराचेंगरी होऊन एकच गोंधळ उडाला अनेक महिला तसेच लहान मुले पायदळी तुडविली गेली.

कोण आहेत भोले बाबा...?

उत्तर प्रदेशातील भोले बाबांच्या सत्संमध्ये भीषण घटना घडली होती. त्यानंतर प्रत्येक सोशल मीडियापासून ते प्रत्येक ठिकाणी भोले बाबा यांच्या विषयीची माहिती लोक जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहेत. भोले बाबा नारायण साकार हरी या नावाने ओळखले जातात. भोले बाबा हे पश्चिम यूपीमध्ये अधिक लोकप्रिय आहे. हे त्यांच्या भक्तांना मोह माया सोडून भगवंत्याच्या भक्तीत लीन होण्याचे ज्ञान देत असतात शिवाय यांचा राजकारणाशीही संबंध आहे.

काही महत्त्वाच्या घटना...

उत्तर प्रदेशच्या हाथरस या घटनेच्या आधीही अनेक अशा घटना घडलेल्या आहेत त्यातील काही महत्त्वाच्या घटनांबद्दल जाणून घेऊयात. त्यातील एक घटना म्हणजे २७ ऑगस्ट २००३ मध्ये नाशिक येथे कुंभमेळ्यादरम्यान घडली होती. या घटनेत तब्बल ३९ जणांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर ३ ऑगस्ट २००८ तर ३० सप्टेंबर २००८ तर २०१२ मध्ये अशा अनेक चेंगराचेंगरीनेमुळे अनेक व्यक्तीचा मृत्यू झाला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Famous Actor Missing : 'मुन्ना भाई एमबीबीएस'मधील लोकप्रिय अभिनेता बेपत्ता; गर्लफ्रेंडसोबत होती भांडणं, नेमकं प्रकरण काय?

Maharashtra Live News Update : निलेश गायवळ यावर आत्तापर्यंत १० गुन्हे दाखल

Accident News : समृद्धी महामार्गावर एका रात्रीत चार अपघात; सुदैवाने जीवितहानी टळली

Post Office Scheme: पोस्ट ऑफिसची जबरदस्त योजना! ५ वर्षात मिळणार ५ लाखांचं व्याज; वाचा सविस्तर

Lifestyle: हार्ट अटॅक आणि स्ट्रोक येण्यामागे आपल्या 'या' घाणेरड्या सवयी कारणीभूत; धोका कोणाला जास्त?

SCROLL FOR NEXT