Thief Steals Snake Idol  Saam Tv
व्हायरल न्यूज

CCTV Video : दबक्या पावलाने आला... आधी हात जोडले मग पाया पडला अन् देवाची मूर्ती घेवून पळाला

Thief Steals Snake Idol From Temple In Bihar : बिहारमधील चोरीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय. मंदिरातील चोरीची घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झालीय.

Rohini Gudaghe

मुंबई : आपण गुन्हेगारीशी संबंधित रोज नवनवीन घटना ऐकतो. बिहारमध्ये देखील अशीच एक विचित्र घटना घडलेली आहे. एक चोर मंदिरात गेला. हात जोडून देवासमोर नतमस्तक झाला. आजुबाजूचा अंदाज घेत त्याने शिवलिंगावर असलेल्या नागाच्या मूर्तीवर डल्ला मारला. त्याची चोरी करून तेथून पळ काढला. चोरीची ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालीय.

ही घटना बिहारमधील छपरा येथील एका मंदिरातील असल्याचं सांगितलं जातंय. भगवान शंकराच्या गळ्यातील तांब्याचा नाग चोरट्याने चोरून नेला. मात्र, चोरी करण्यापूर्वी त्याने शिवलिंगाची पूजा (viral news) केली. भगवान बाजार पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दौलतगंज रतनपुरा परिसरात ही घटना घडली. सीसीटीव्ही फुटेज पाहता चोर पूजा समारंभामध्ये आल्याचं दिसतंय. नेटकऱ्यांना मात्र चोरीचा हा अंदाज चांगलाच भावलाय.

चोरीची घटना CCTV मध्ये कैद

व्हिडिओमध्ये दिसतंय की, चोर अगदी आरामात प्रवेश करतोय. नंतर शिवलिंगासमोर जातो आणि गंभीर मुद्रेत हात जोडून उभा राहतो. मग साप उचलतो आणि आपल्या शर्टामध्ये घालून तेथून पोबारा (viral video) करतो. घटनेनंतर हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. घडलेल्या प्रकारामुळे लोक या चोराचं कौतुक करताना दिसत आबे. एका यूजरने कमेंट केलीय की, 'चोरी केल्यानंतर देवाची माफी मागणारा हा संस्कारी चोर आहे. त्याचवेळी 'चोराने आधी देवाला प्रसाद दिला आणि नंतर देवाचा प्रसाद चोरला', असं देखील काहीजणांनी लिहिलंय.

पाया पडला अन् देवाची मूर्ती घेवून पळाला

पोलिसांनी या चोरट्याचा शोध सुरू केला आहे. या घटनेची माहिती देताना भगवान बाजार पोलीस स्टेशनचे प्रभारी सुभाष कुमार यांनी हिंदी वृत्तवाहिनीला दिलेल्या माहितीनुसार, सीसीटीव्ही फुटेजमध्ये चोर शिवलिंगावर ठेवलेला नाग उचलत असल्याचं (Bihar News) दिसतंय. त्याने तो नाग कापडात गुंडाळला अन् घटनास्थळावरून पळ (Thief Steals Snake Idol From Temple) काढला. सध्या या चोरट्याचा शोध सुरू आहे. यावर मंदिर प्रशासनाने अद्याप कोणतेही वक्तव्य केलेलं नाही. घटनेनंतर मंदिरातील भाविकांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Election:प्रचाराच्या तोफा थंडावणार, मतदानाच्या ४८ तासाआधी काय करावे? काय करु नये?

Maharashtra Election : प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! छुप्या प्रचारावर करडी नजर

Viral Video: रुग्णवाहिकेला रस्ता न देणे महागात पडले, पोलिसांनी शिकवल धडा, लाखोंचा दंड, लायसन्सही रद्द, Video बघाच

Post Office Scheme: पोस्ट ऑफिसची जबरदस्त योजना! दर महिन्याला मिळणार ९००० रुपये; कसं? जाणून घ्या

Success Story: IIT मुंबईमधून शिक्षण, लाखोंची नोकरी नाकारली, अवघ्या २२ व्या वर्षी UPSC क्रॅक ;IAS सिमी करण यांची सक्सेस स्टोरी

SCROLL FOR NEXT