Thane Railway Station Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Thane Railway Station Viral Video: ठाण्यात धावत्या रेल्वेत चढण्याचा प्रयत्न, पाय घसरला अन्... व्हिडीओ पाहून उडेल थरकाप

Thane Viral Video: ठाण्यात धावत्या रेल्वेत चढण्याचा प्रयत्न, पाय घसरला अन्... व्हिडीओ पाहून उडेल थरकाप

Satish Kengar

Thane Railway Station Viral Video: काळ आला होता पण वेळ आली नव्हती, या म्हणीची प्रचिती आज ठाणे रेल्वे स्टेशनवर बघायला मिळाली आहे. या रेल्वे स्थानकावर धावत्या रेल्वे गाडीत चढण्याच्या नादात एका व्यक्तीने जीव गमावला असता.

रेल्वेत चढत असताना पाय घसरल्याने हा व्यक्ती रेल्वे आणि प्लॅटफॉर्मच्या मध्ये अडकून खाली जात होता. मात्र या ठिकाणी कर्तव्य बजावणाऱ्या सुरक्षारक्षकाच्या निदर्शनास ही बाब लक्षात येता अत्यंत तातडीने त्याने पळत जात त्याला बाहेर खेचले. या घटनेचा व्हिडीओही समोर आला आहे. जो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

मध्य रेल्वेने (Central Railway) या घटनेचा व्हिडीओ ट्वीट करत याबाबत माहिती जाहीर केली आहे. मध्य रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, आज सकाळी 7.30 च्या सुमारास गाडी क्रमांक 22183 (साकेत एक्सप्रेस) मुंबईहून कल्याणच्या दिशेने जात होती. (Latest Marathi News)

ही रेल्वे प्लॅटफॉर्म क्रमांक 7 वर आली होती. यानंतर जेव्हा ही रेल्वे जाऊ लागली तेव्हाच एक प्रवासी धावत आला आणि रेल्वेत चढण्याचा प्रयत्न करू लागला. मात्र असं करत असताना या व्यक्तीचा पाय घसरला आणि तो रेल्वे आणि प्लॅटफॉर्मच्या मध्ये अडकला.

अचानक घडलेल्या या प्रकारामुळे घटनास्थळी एकच खळबळ उडाली. यादरम्यान ऑन ड्युटी आरपीएफ जवान सुमित पाल याच्या ही घटना निदर्शनास येताच त्यांनी तातडीने प्रवाशाला बाहेर काढले. त्यामुळे प्रवाशांचा जीव वाचला. घटनेनंतर आरपीएफकडून प्रवाशाला प्लॅटफॉर्म क्रमांक 2 वर असलेल्या क्लिनिकमध्ये प्राथमिक उपचार घेऊन जाण्यात आलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IND vs AUS: ऋतुराज गायकवाड मायदेशी परतणार! या खेळाडूला बॅकअप म्हणून थांबवलं; शमीबाबतही घेतला निर्णय

Pune Crime: आधी अपहरण, नंतर निर्घृण हत्या अन् मृतदेहाचे तुकडे; बांधकाम व्यवसायिकाच्या हत्येने पुणे हादरले

Government Job: कोणत्याही परिक्षेशिवाय मिळणार सरकारी नोकरी; RITES मध्ये भरती सुरु; पगार ४६०००, जाणून घ्या सविस्तर

65 वर्षे जुना कायदा बदलण्याच्या तयारीत मोदी सरकार, खासदार अपात्रता कायद्याच्या जागी नवीन कायदा आणण्याची केंद्राची योजना

Maharashtra News Live Updates: पुणे शहरासह जिल्ह्यात आज अनेक नेत्यांच्या सभा

SCROLL FOR NEXT