Central Government Schemes: फक्त 20 रुपये खर्च करून तुम्ही मिळवू शकता 2 लाख रुपयांचा फायदा, जाणून घ्या काय आहे 'ही' योजना...

PM Suraksha Bima Yojana: फक्त 20 रुपये खर्च करून तुम्ही मिळवू शकता 2 लाख रुपयांचा फायदा, जाणून घ्या काय आहे 'ही' योजना...
PM Suraksha Bima Yojana
PM Suraksha Bima Yojanasaam tv
Published On

PM Suraksha Bima Yojana: देशातील विविध उत्पन्न गटांना लक्षात घेऊन सरकार विविध योजना राबवत आहे. देशात आर्थिकदृष्ट्या कमकुवत लोकांची संख्या मोठी आहे. या लोकांना जीवनात अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी त्यांच्यावर असते. अशातच जर कुटुंबप्रमुखाचा अपघात झाला तर या परिस्थितीत संपूर्ण कुटुंबावर संकटांचा डोंगर कोसळतो. (Utility News in Marathi)

यातच आज आम्ही तुम्हाला भारत सरकारच्या एका जबरदस्त योजनेबद्दल सांगणार आहोत. या योजनेचे नाव प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना आहे. योजनेअंतर्गत तुम्ही फक्त 20 रुपये खर्च करून 2 लाख रुपयांचे संपूर्ण विमा संरक्षण मिळवू शकता. ही योजना भारत सरकारने 2015 मध्ये सुरू केली होती. या संदर्भात आपण प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेबद्दल तपशीलवार माहिती घेऊया...

PM Suraksha Bima Yojana
Majhi Kanya Bhagyashree Yojana: तुमच्या मुलीलाही मिळू शकतात 50 हजार रुपये, जाणून घ्या काय आहे 'माझी कन्या भाग्यश्री योजना'

जर एखाद्या व्यक्तीने प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेचा लाभ घेतला असेल. अशा परिस्थितीत विमाधारकाचा अपघाती मृत्यू झाल्यास. अशा स्थितीत नॉमिनीला 2 लाख रुपये दिले जातात.

प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेंतर्गत पूर्ण अपंगत्व आल्यास विमाधारकास 2 लाख रुपये दिले जातात. ज्यामध्ये विमाधारक अंशतः अक्षम असल्यास, या परिस्थितीत त्याला एक लाख रुपये दिले जातात. (Latest Marathi News)

PM Suraksha Bima Yojana
LIC Pension Scheme: एलआयसीची जबरदस्त योजना! फक्त एकदा गुंतवणूक करा, दरमहा मिळेल पेन्शन

या योजनेत अर्ज करण्यासाठी तुम्हाला दरवर्षी प्रीमियमची रक्कम भरावी लागेल. प्रिमियमचे पैसे दरवर्षी 31 मे रोजी बँकेतून आपोआप डेबिट होतात. या योजनेत फक्त तेच लोक अर्ज करू शकतात, ज्यांचे वय 18 ते 70 वर्षे दरम्यान आहे. प्रधानमंत्री सुरक्षा विमा कव्हरचा कालावधी 1 जून ते 31 मे पर्यंत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com