A man tries to cross a flooded bridge in Dindori, Madhya Pradesh, but gets swept away along with his bike — shocking visuals captured in viral video Saam Tv
व्हायरल न्यूज

थरारक! पूल ओलांडताना तरुण नदीत वाहून गेला; हृदयाचा ठोका चुकवणारा VIDEO व्हायरल

Bike Accident Flood: मध्य प्रदेशातील डिंडोरी जिल्ह्यात भीषण पूरस्थितीमुळे एक तरुण बाईकसह पुलावरून वाहून गेला. हा थरारक प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला असून व्हिडिओ पाहून अंगावर शहारे येतील. घटनास्थळी एकच खळबळ उडाली.

Tanvi Pol

Madhya Pradesh Flood Video: मध्य प्रदेशातील डिंडोरी जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे अनेक नद्या दुथडी भरून वाहत आहेत. त्यामुळेच पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली असून अनेक रस्ते, पुलं पाण्याखाली गेली आहेत. अशाच भीषण परिस्थितीत एक धक्कादायक घटना घडली आहे. पाण्याचा अंदाज न आल्याने एक तरुण आपल्या दुचाकीसह भर पाण्यात गेला आणि काही क्षणातच तो पाण्याच्या प्रवाहात वाहून गेला. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झालेला आहे.

घटना घडली तरी कुठे?

ही घटना डिंडोरी जिल्ह्यातील एका पुलावर घडली. या भागात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पावसाने (Rain)हाहाकार माजवला आहे. नद्या आणि नाल्यांना पूर आला असून अनेक ठिकाणी पाणी वाहतुकीसाठी वापरण्यात येणाऱ्या रस्त्यांवर आणि पुलांवरून वाहू लागले आहे. अशाच एका पुलावरून एक तरुण आपल्या बाईकसह जात असताना अचानक तो पाण्याच्या प्रवाहात अडकला. बाईकचा तोल सुटताच काही क्षणातच तो तरुण पाण्यात कोसळला आणि बघता-बघता तो पाण्यात वाहून गेला.

घडलेल्या घटनेचा व्हिडीओ(Video) काही नागरिकांनी शूट केला असून तो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. व्हिडीओमध्ये स्पष्टपणे दिसते की तरुणाने पुलावरून जाण्याचा प्रयत्न केला आणि पाण्याचा वेग लक्षात न घेतल्यामुळे तो पाण्यात वाहून जातो. नशिबाने तरुणाला पोहता येत असल्याने तो पोहत नदीच्या काठापर्यंत येतो. हे दृश्य इतकं भयावह आहे की अनेकांना तो पाहून धक्का बसला आहे.

या घटनेनंतर स्थानिक प्रशासनावर अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. पूरस्थिती असताना देखील संबंधित पुल बंद का करण्यात आला नाही? पाण्याचा अंदाज असतानाही तेथून वाहतुकीला मुभा देणं कितपत योग्य होतं? नागरिकांनी प्रशासनाकडे योग्य त्या उपाययोजनांची मागणी केली आहे. दरवर्षी पावसाळ्यात अशा घटनांची पुनरावृत्ती होत असून देखील ठोस उपाययोजना न होणं हे चिंतेचं कारण बनलं आहे.

टीप : हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Weather Update : राज्यात पावसाचा ब्रेक! पुढील 5 दिवस पावसाचा जोर कमी, हवामान विभागाचा अंदाज | VIDEO

Viral News : एकमेकींचे केस धरले, लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण; २ महिला वकिलांचा भररस्त्यात राडा; पाहा VIDEO

Maharashtra Live News Update: वाटद एमआयडीसी विरोधात आज होणार शेतकऱ्यांची जनआक्रोश सभा

अरे बापरे! रात्रीच्या अंधारात रस्त्यावर ८ फूट लांबीची मगर; पाहताक्षणी नागरिकांचा अडकला श्वास

Tesla Cars: ५०० किमी पेक्षा अधिक रेंज देणाऱ्या टेस्लाच्या सर्वोत्तम ५ मॉडेल्स

SCROLL FOR NEXT