Student mercilessly beaten by teacher at Mahatma Phule College in Latur; shocking incident caught on camera Saam Tv
व्हायरल न्यूज

शिक्षक आहेत की गुंड? विद्यार्थ्याला बेदम मारहाण; व्हिडिओ पाहून संताप अनावर

Latur Student Video: लातूरच्या अहमदपूर येथील एका महाविद्यालयात विद्यार्थ्याला शिक्षकाने बेदम मारहाण केली. हा धक्कादायक प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला असून, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल झाल्याने संतापाची लाट उसळली आहे.

Tanvi Pol

लातूर जिल्ह्यातील अहमदपूर तालुक्यातून गुरुपौर्णिमेच्या दिवशीच एक संतापजनक आणि धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शिक्षणाचे मंदिर समजल्या जाणाऱ्या शाळेमध्येच शिक्षकांनी एका विद्यार्थ्यावर हल्ला केलेला आहे. अहमदपूर येथील महात्मा फुले माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालयात टीसीचा दाखला म्हणजेच शाळा सोडल्याचा दाखला काढण्यासाठी गेलेल्या एका विद्यार्थ्याला शाळेतील मुख्याध्यापकासह काही शिक्षकांनी बेदम मारहाण केली आहे.

टीसी मागितल्याने पेटले शिक्षक!

मिळालेल्या माहितीनुसार, पीडित विद्यार्थी महाविद्यालयातून बारावी उत्तीर्ण झाल्यानंतर पुढील शिक्षणासाठी दुसऱ्या ठिकाणी जाण्याचा विचार करत होता. त्यासाठी त्याला महाविद्यालयाकडून शाळा सोडल्याचा दाखला म्हणजेच टीसी पाहिजे होता. विद्यार्थ्याने टीसी मिळवण्यासाठी आवश्यक ती फी भरली आणि त्या शुल्काची पावती मागितली. मात्र, याच कारणावरून महाविद्यालयातील मुख्याध्यापक आणि इतर तीन शिक्षक(Teacher) चिडले आणि त्यांनी विद्यार्थ्याला बेदम मारहाण केली.

ही मारहाण इतकी भयंकर होती की, विद्यार्थ्याला शारीरिक आणि मानसिक दोन्ही पातळ्यांवर गंभीर परिणाम भोगावे लागले. गुरूला वंदन करणाऱ्या या पवित्र दिवशीच एका विद्यार्थ्याला शिक्षण देणाऱ्या गुरूकडूनच झालेल्या अमानुष मारहाणीमुळे सगळीकडून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

मुख्याध्यापकासह चार शिक्षकांवर गुन्हा दाखल

विद्यार्थ्याच्या(Stundet) तक्रारीवरून अहमदपूर पोलीस ठाण्यात मुख्याध्यापक आणि इतर तीन शिक्षकांविरोधात संबंधित कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास करत असून लवकरच आरोपी शिक्षकांविरोधात कारवाई करण्यात येणार असल्याचे समजत आहे.

टीप: हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Diabetes : डायबिटीजग्रस्त चिमुरड्यांसाठी मॅटेलकडून अनोखी 'बार्बी डॉल' लॉन्च

Narendra Jadhav : उद्धव ठाकरे CM असताना त्रिभाषा सूत्र अहवाल स्वीकारला होता? समितीचे अध्यक्ष नरेंद्र जाधव नेमकं काय म्हणाले?

Maharashtra Politics : विधानभवनात गद्दारीवरून राडा! 'तू बूट चाटत होतास', शिंदेंच्या मंत्र्यांची जीभ घसरली

Maharashtra Politics : अधिवेशन मुंबईत,एकनाथ शिंदे दिल्लीत; महायुती सरकारमध्ये गँगवॉर?

पृथ्वी विनाशाच्या उंबरठ्यावर? पृथ्वीचा अंत जवळ येतोय? स्टीफन हॉकिंग यांची भयावह भविष्यवाणी

SCROLL FOR NEXT