Indian Cricketer Viral Video Saam Digital
व्हायरल न्यूज

Indian Cricketer Viral Video: हातात कॅमेरा अन् माईक घेऊन सूर्याने गाठलं मरीन ड्राईव्ह! अन् पुढे जे झालं ते भन्नाटच;VIDEO

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Indian Cricketer Viral Video

सध्या भारतात वर्ल्डकप २०२३ स्पर्धेचा थरार सुरु आहे. या स्पर्धेतील काही सामने हे मुंबईतील वानखेडे स्टेडियममध्ये होणार आहेत. गुरुवारी(२ नोव्हेंबर) वानेखेडे स्टेडियमवर भारत आणि श्रीलंकेचा सामना पार पडला. या सामन्यानंतर भारतीय संघातील धडाकेबाज फलंदाज सूर्यकुमार यादवचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

भारतीय संघातील प्रत्येक खेळाडूचे खोडकर किस्से कायमच सोशल मीडियावर वाऱ्याच्या वेगात व्हायरल होत असतात. त्यामध्ये कधी किंग कोहलीचे मैदानातील गमतीदार व्हिडिओ असतील तर कधी माहीच्या डॅशिंग लूकचे व्हिडिओ असतील हे नेहमीच चाहत्यांसाठी चर्चेचा विषय ठरत असतात. पण सध्या व्हायरल होणारा व्हिडिओ धोनी-कोहलीचा नव्हे तर सूर्यकुमार यादवचा आहे.

व्हायरल झालेल्या व्हिडिओत आपल्याला दिसत आहे की,भारताचा स्टार फलंदाज सूर्यकुमार यादव मुंबईच्या मरीन ड्राईव्हवर फेरफटका मारण्यासाठी उतरला होता. आपल्याला कोणी ओळखू नये म्हणून हातावरचे टॅटू लपवण्यासाठी त्याने फुल हाताचा शर्ट घातला आहे. त्यानंतर तो आपला चेहरा लपवण्यासाठी मास्क लावताना दिसून येत आहे. मग काय कॅमेरा आणि माईक घेऊन सूर्याने थेट मरीन ड्राईव्ह गाठलं.

मरीन ड्राईव्हला गेल्यानंतर तो चाहत्यांना प्रश्न विचारताना दिसून येत आहे. यामध्ये तो चाहत्यांना क्रिकेटचे प्रश्न विचारताना दिसून येत आहे. त्यात त्याने रोहित शर्मा,श्रेयस अय्यर आणि सूर्यकुमार यादवमध्ये तुमचा आवडता फलंदाज कोण? असे काही प्रश्न विचारले. यावर चाहत्यांनीही भन्नाट प्रतिक्रिया दिल्या.सूर्यकुमारने व्हिडिओच्या शेवटी मास्क काढून चाहत्यांना आपला चेहरा दाखवला. मास्क काढल्यानंतर तेथील चाहत्यांना धक्काच बसलेला आहे.व्हायरल व्हिडिओ फलंदाज सूर्यकुमार यादव याने आपल्याच इंन्स्टाग्राम अकांउटंवरुन पोस्ट केला आहे

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sukanya Samruddhi Yojana: १० हजार १५ वर्षे भरा, २१ व्या वर्षी मुलीच्या खात्यात तब्बल ३८ लाख; जाणून घ्या सरकारची भन्नाट योजना

Maharashtra Politics : महायुतीच्या जागावाटपाचं घोडं कुठं अडलं? कोणत्या पक्षाला काय हवं?

Mumbai Metro News: मुंबईकरांसाठी गुड न्यूज! 'मेट्रो ३' आरे ते बीकेसी टप्पा लवकरच सुरु होणार; ऑक्टोंबरमध्ये PM मोदी करणार लोकार्पण

Maharashtra Politics : अमित शहा पुन्हा महाराष्ट्र दौऱ्यावर येणार; महायुतीत काहीतरी मोठं घडणार, नेमकं काय?

Petrol Diesel Price : विधानसभेच्या आधी राज्य सरकार मोठा निर्णय घेणार, पेट्रोल-डिझेलच्या दरात कपात?

SCROLL FOR NEXT