वर्ल्डकप २०२३ स्पर्धा सुरू असताना आयसीसीने वनडे क्रमवारीची घोषणा केली आहे. वनडे फलंदाजांच्या यादीत भारतीय फलंदाजांचा बोलबाला पाहायला मिळाला आहे. भारतीय फलंदाज शुभमन गिल लवकरच बाबर आझमला मागे सोडून नंबर १ बनू शकतो.
वर्ल्डकप २०२३ स्पर्धेत पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमला हवी तशी कामगिरी करता आलेली नाही. त्याने वर्ल्डकप स्पर्धेत नंबर १ फलंदाज म्हणून एन्ट्री केली होती. मात्र वर्ल्डकप स्पर्धा संपेपर्यंत त्याची वनडेतील बादशाहत संपुष्टात येऊ शकते.
या यादीत शुभमन गिल दुसऱ्या स्थानी आहे. या दोघांना वगळलं तर, सहा असे फलंदाज आहेत जे या स्पर्धेत धावांचा पाऊस पाडताना दिसून येत आहेत. त्यामुळे वनडेत नंबर १ बनण्यासाठी आता आठ फलंदाजांमध्ये चुरशीची लढत सुरू आहे.
दक्षिण आफ्रिकेचे फलंदाज रांगेत..
बाबर आझम ८२९ रेटिंग पॉइंट्ससह या यादीत अव्वल स्थानी विराजमान आहे. तर त्याच्या पाठोपाठ असलेला शुभमन गिल ८२३ रेटिंग पॉइंट्ससह दुसऱ्या स्थानी आहे. बाबरला वनडे रँकिंगमध्ये मागे सोडण्यासाठी शुभमन गिलला केवळ एका मोठ्या इंनिंगची गरज आहे.
वर्ल्डकप २०२३ स्पर्धेत दक्षिण आफ्रिकेचा फलंदाज क्विंटन डी कॉक सध्या जोरदार फॉर्ममध्ये आहे. गेल्या ५ सामन्यांमध्ये त्याने ३ शतकं ठोकली आहेत. तो ७६९ रेटिंग पॉइंट्ससह तिसऱ्या स्थानी पोहोचला आहे. तर हेनरिक क्लासेन ७५६ रेटिंग पॉइंट्ससह चौथ्या स्थानी पोहोचला आहे. (Latest sports updates)
विराट कोहलीची नंबर १ बनण्याच्या दिशेने वाटचाल..
भारतीय संघातील अनुभवी फलंदाज विराट कोहली आणि डेव्हिड वॉर्नर दोघेही पाचव्या स्थानी विराजमान आहेत. दोघांचेही रेटिंग पॉइंट्स ७४७ इतके आहेत. या दोन्ही फलंदाजांनी वर्ल्डकप २०२३ स्पर्धेत आपआपल्या संघासाठी दमदार कामगिरी केली आहे.
आयर्लंडचा फलंदाज हॅरी टेक्टर ७२९ रेटिंग पॉइंट्ससह सातव्या क्रमांकावर विराजमान आहे. तर भारताचा कर्णधार रोहित शर्मा ७२५ रेटिंग पॉइंट्ससह आठव्या स्थानी पोहोचला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.