Viral Video Saam TV
व्हायरल न्यूज

Viral Video: एकीकडे ऑनलाईन लेक्चर अन् दुसरीकडे चुल्हीवरची भाकरी; शिक्षणासाठी लहान मुलाचा संघर्ष पाहून डोळ्यात आसवं दाटतील

Students studied while cooking: सर जे काही सांगत आहेत ते तो आपल्या वाहिमध्ये लिहून घेत आहे. आता असे करताना शिक्षणासह त्याला पोटाचीही भूक भागवायची आहे. मात्र त्याला भाकरी करून द्यायला कोणीच नाही.

Ruchika Jadhav

Students Struggling Video:

आपल्या कुटुंबातील, समाजातील आर्थिक गरिबी दूर करण्यासाठी शिक्षण फार गरजेचे आहे. शिक्षणाशिवाय आयुष्यात संपूर्ण अंधार आहे. या सर्व गोष्टी आता प्रत्येक गरिबाला समजल्यात. त्यामुळे प्रत्येक जण शिक्षणाच्या मागे धावत आहे. अशातच सोशल मीडियावर मन हेलावणारा एक व्हिडिओ समोर आला आहे. व्हिडिओ पाहून तुमच्याही डोळ्यांत अश्रू दाटतील.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक लहान मुलगा आपल्या घरी एका छोट्या फोनमध्ये ऑनलाईन क्लास करत आहे. सर जे काही सांगत आहेत ते तो आपल्या वहिमध्ये लिहून घेत आहे. आता असे करताना शिक्षणासह त्याला पोटाचीही भूक भागवायची आहे. मात्र त्याला भाकरी करून द्यायला कोणीच नाही. त्यामुळे हा चिमुकला स्वतःच भाकरी बनवत आहे.

एकीकडे ऑनलाईन लेक्चर आणि दुसरीकडे तव्यावरची भाकरी यामध्ये शिक्षणासाठी सुरू असलेली त्याची धडपड पाहून अनेक नेटकरी भाऊक झालेत. साधारणपणे चौथी किंवा पाचवीचा हा मुलगा असावा. त्याने लेक्चर सुरू असतानाच भाकरी बनवायला घेतली आहे. भाकरी भाजल्यावर हा मुलगा ती भाकरी आपल्या हातानेच उलटत आहे. आता असं करताना अचानक त्याचा हात भाजतो.

चटका लागल्यावर तो कळवळतो हातातली भाकरी टोपल्यात टाकतो आणि स्वतःच आपल्या हाताला फुंकर मारून वेदना सहन करत असतो. तितक्यात समोर लेक्चर सुरू आहे त्याच्या लक्षात येतं. आपल्या वेदना तिथेच मारून त्याच हाताने पुन्हा तो लिहिण्यास सुरुवात करतो. चीमुकल्याचा हा संघर्ष खरोखर मनाला चटका लावणारा आहे.

परिस्थिती माणसाला खूप काही शिकवते हेच या व्हिडिओमधून समजतं. आजकालची चांगल्या घरातली मुलं अभ्यासाचा कंटाळा करतात. सर्व सुखसोयी चांगली शाळा, महागडा क्लास असूनही अभ्यास करत नाहीत, नापास होतात. आपल्या वडिलांच्या जीवावर जगतात. त्या सर्वच विद्यार्थ्यांच्या डोळ्यात अंजन घालणारा हा व्हिडिओ आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune: भावकीच्या वादातून तुंबळ हाणामारी, एकमेकांवर कोयत्याने सपासप वार; तिघे गंभीर जखमी; थरारक VIDEO

Maharashtra Politics : पुण्यात काँग्रेसला बसणार धक्का, ५ नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा

Mumbai Metro: मेट्रोने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! पुढचे ७ दिवस या मार्गांवरील वेळापत्रकात बदल

Maharashtra Live News Update : स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी मुख्यमंत्री अ‍ॅक्टिव मोडमध्ये

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींनो, eKYC केलीत? तरीही हफ्ता थांबणार, योजनेतील सरकारचा नवीन नियम वाचलात का?

SCROLL FOR NEXT