Shreya Maskar
पावसाळ्यात सापुतारा हिल स्टेशनला नक्की भेट द्या. सापुतारा हे गुजरात-महाराष्ट्र सीमेवरील सह्याद्री पर्वतरांगेत वसलेले एक लोकप्रिय थंड हवेचे ठिकाण आहे.
सापुतारा हिल स्टेशन पश्चिम घाटातील घनदाट जंगलांनी वेढलेले आहे. हे ठिकाण थंड हवामान, हिरवीगार खोरी आणि भव्य धबधब्यांमुळे पर्यटकांना आकर्षित करते.
सापुतारा हिल स्टेशन हे हनिमूनसाठी एक बेस्ट लोकेशन आहे. तुम्ही येथे कपल ट्रिप प्लान करू शकता. निसर्गाच्या सानिध्यात भन्नाट फोटोशूटचा आनंद घ्या.
सापुतारा हिल स्टेशनला गेल्यावर तुम्ही बोटिंगचा आनंद घेऊ शकता. सापुतारा हिल स्टेशनच्या जवळ गिरा धबधबा देखील आहे. सुमारे ७५ फूट (३० मीटर) उंचीवरून कपरी नदीचे पाणी अंबिका नदीत कोसळते.
टेबल पॉईंट, सनसेट पॉईंट आणि सनराईज पॉईंट येथून आजूबाजूच्या टेकड्या आणि खोऱ्यांची विस्तीर्ण, विहंगम दृश्ये दिसतात. सनसेट पॉईंटजवळच इको पॉईंट देखील आहे. जिथे तुमचा आवाज नैसर्गिकरित्या तुमच्याकडे परत घुमतो.
आर्टिस्ट व्हिलेज येथे स्थानिक आदिवासी कलाकारांनी बनवलेल्या वस्तू, हस्तकला, वारली पेंटिंग आणि बांबूपासून बनवलेल्या कलाकृती पाहायला आणि खरेदी करायला मिळतात.
सापुतारा आदिवासी संग्रहालयात डांग भागातील आदिवासी लोकांची जीवनशैली, इतिहास, हस्तकला, पारंपारिक वेशभूषा, दागिने आणि वाद्ये जतन करून ठेवली आहेत.
वरील माहितीचा उद्देश केवळ पर्यटन स्थळांची ओळख करून देणे हा आहे. यातील माहिती इंटरनेटवरील उपलब्ध सोर्समधून घेण्यात आली. कोणत्याही वादाशी किंवा दाव्याशी आमचा संबंध नाही.