Shruti Vilas Kadam
दक्षिण-पश्चिम मान्सून साधारणपणे १ जूनच्या आसपास केरळ किनारपट्टीवर दाखल होतो. त्यानंतर तो टप्प्याटप्प्याने संपूर्ण देशभर पसरतो.
भारतीय हवामान विभागाच्या (IMD) सामान्य मान्सून प्रगतीनुसार, पश्चिम राजस्थान हा भाग मान्सून सर्वात उशिरा पोहोचणाऱ्या प्रदेशांपैकी एक मानला जातो.
राजस्थानमधील जैसलमेर, बाडमेर आणि आसपासच्या वाळवंटी भागांमध्ये मान्सून साधारणपणे जुलैच्या मध्यापर्यंत किंवा त्यानंतर पोहोचतो.
अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरातून येणाऱ्या मान्सून वाऱ्यांचा प्रभाव या भागात तुलनेने उशिरा पोहोचतो. त्यामुळे पावसाचे आगमन विलंबाने होते.
राजस्थानच्या पश्चिमेकडील भागात मान्सून उशिरा येण्यासोबतच पावसाचे प्रमाणही देशातील इतर भागांच्या तुलनेत कमी असते.
मान्सून आधी महाराष्ट्र, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, दिल्ली आणि पंजाबपर्यंत पोहोचतो. त्यानंतर तो राजस्थानच्या पश्चिम भागात प्रवेश करतो.
विशेष म्हणजे, मान्सून परतण्याची प्रक्रिया देखील साधारणपणे पश्चिम राजस्थानपासूनच सुरू होते. त्यामुळे आगमन आणि माघार या दोन्ही बाबतीत हा भाग महत्त्वाचा मानला जातो.