Blouse Sleeves Design: लग्नसराई किंवा पार्टीसाठी ट्राय करा ब्लाउजच्या हातांचे ७ लेटेस्ट ट्रेंडी डिझाइन्स

Shruti Vilas Kadam

पफ स्लीव्ह्ज डिझाइन

पफ स्लीव्ह्ज ब्लाऊजला रॉयल आणि एलिगंट लूक देतात. सिल्क, बनारसी आणि पारंपरिक साड्यांसोबत हा डिझाइन विशेष उठून दिसतो.

Puff Sleeves Blouse Designs

बेल स्लीव्ह्ज डिझाइन

घंटीच्या आकाराच्या बेल स्लीव्ह्ज सध्या खूप ट्रेंडमध्ये आहेत. या स्लीव्ह्जमुळे ब्लाऊजला मॉडर्न आणि फॅशनेबल लूक मिळतो.

Blouse Sleeves Designs

नेट स्लीव्ह्ज डिझाइन

नेट फॅब्रिकच्या स्लीव्ह्जमुळे ब्लाऊज अधिक आकर्षक आणि स्टायलिश दिसतो. पार्टी, रिसेप्शन किंवा विशेष कार्यक्रमांसाठी हा डिझाइन उत्तम पर्याय आहे.

Blouse Sleeves Designs

कोल्ड शोल्डर स्लीव्ह्ज

खांद्याचा काही भाग खुला ठेवणाऱ्या कोल्ड शोल्डर स्लीव्ह्ज तरुणींमध्ये विशेष लोकप्रिय आहेत. इंडो-वेस्टर्न आणि ट्रेंडी लूकसाठी हा डिझाइन योग्य ठरतो.

Puff Sleeves Blouse Designs

एम्ब्रॉयडरी स्लीव्ह्ज

जरी, मिरर वर्क किंवा धाग्याच्या नक्षीने सजवलेल्या स्लीव्ह्ज ब्लाऊजची शोभा वाढवतात. लग्नसमारंभ आणि सणांसाठी हा डिझाइन उत्तम मानला जातो.

Blouse Sleeves Designs

एल्बो-लेंथ स्लीव्ह्ज

कोपरापर्यंत असलेल्या स्लीव्ह्ज पारंपरिक आणि क्लासिक लूक देतात. पैठणी, कांजीवरम आणि सिल्क साड्यांसोबत या स्लीव्ह्ज विशेष आकर्षक दिसतात.

Blouse Sleeves Designs

फ्रिल स्लीव्ह्ज डिझाइन

फ्रिल किंवा रफल्स असलेल्या स्लीव्ह्ज ब्लाऊजला नवा आणि हटके लूक देतात. हलक्या फुलक्या कार्यक्रमांसाठी हा डिझाइन सध्या खूप पसंत केला जात आहे.

Blouse Sleeves Designs

Silver Chain Designs: रोजच्या वापरासाठी बेस्ट आहे चांदीची चेन; कमी बजेटच्या या ७ ट्रेंडी डिझाईन्स नक्की पाहा

Silver Chain Designs | Saam Tv
येथे क्लिक करा