सोलापूर विधानपरिषद निवडणुकीत एकूण 7 जणांचे उमेदवारी अर्ज वैध ठरले आहेत. भाजपचे राजेंद्र राऊत, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे वसंत देशमुख,शिंदेसेनेचे बंडखोर रमेश बारस्कर, शिंदेसेनेचे बंडखोर महेश साठे, शिवसेने उबाठा बंडखोर नागेश अक्कलकोट,शिवसेना उबाठा बंडखोर धनंजय डिकोळे आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे जीवन जानकर हे आता मैदानात असणार आहेत.
पहिल्याच पावसात नाशिक महापालिकेच्या तयारीचा बोजवारा उडाला आहे. शहरातील रस्ते चिखलमय, खोदकाम केलेल्या ठिकाणी वाहने अडकली. तसेच पालिकेचे नालेसफाईचे दावे पावसात वाहून गेले, अनेक भागांत पाणी साचले.
धानोरे फाट्यापासून धानोरे गावाकडे जाणाऱ्या रस्त्यालगत असलेल्या एका भंगार गोदामाला भीषण आग लागल्याची माहिती प्राप्त झाली. सदर गोदाम हे बबलू तिवारी यांच्या मालकीचे असून त्यामध्ये मोठ्या प्रमाणात भंगार साहित्य साठवलेले होते.
मिक्सरमध्ये ड्राइवर नसतात ट्रक सुटला सुसाट..
ड्राइवरने हॅन्ड ब्रेक लावला नसल्याने घडली घटना
या परिसरात नेहमीच असते वर्दळ असलेल्या भागातील प्रकार
पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील चांडोली येथे वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसाने मोठे नुकसान झाले आहे. घराचे छप्पर अंगावर कोसळून ६९ वर्षीय शेतकरी हरिभाऊ थोरात यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. अनेक घरांचे छप्पर उडाले असून शेती, पॉलिहाऊस आणि पशुधनाचेही मोठे नुकसान झाले आहे.
अकोल्यात अन्न व औषध प्रशासनाने (FDA) भेसळीच्या संशयावरून मोठी कारवाई करत १४० लिटर तुपाचा साठा जप्त केला. बाळापूर रस्त्यावरील नवीन किराणा संकुलातील ‘गुरूकृपा सेल्स’ या दुकानाची तपासणी करण्यात आली. ‘काऊ घी’ (मिल्क क्रीम) या नावाने विक्रीसाठी ठेवलेल्या तुपात भेसळ असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला. तुपाचे नमुने तपासणीसाठी ताब्यात घेण्यात आले असून जप्त साठ्याची किंमत सुमारे ८७ हजार रुपये असल्याची माहिती प्रशासनाने दिली.
प्रफुल्ल आरिफ स्वामी स्वामी वय 27 याचा आज वायसीएम हॉस्पिटल मध्ये उपचार घेत अस्ताना झाला मृत्यू
एकाचा मृत्यू, एकाला वाचविण्यात यश
पोलिस कर्मचारी आणि झीप लाईनच्या कर्मचाऱ्यांनी जीवाची बाजी लावत एकाला वाचवले
अतुल रघुनाथ सुतार असं मयत विद्यार्थ्याचं नाव
तर मयूर विष्णू खाडे याला स्थानिकांनी वाचवलं
यवतमाळ विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपचे बंडखोर नेते नितीन भुतडा यांनी मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्यमंत्री इंद्रनील नाईक आणि भाजप आमदार राजू तोडसाम यांची भेट घेतली. या भेटीत विधान परिषद निवडणुकीसंदर्भात चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, उद्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत होणाऱ्या बैठकीनंतर उमेदवारीबाबत अंतिम निर्णय घेणार असल्याचे नितीन भुतडा यांनी सांगितले आहे. राजकीय वर्तुळात या भेटीची जोरदार चर्चा सुरू आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातील अंजर्ले-सावने समुद्रकिनारी एका पर्यटकाची कार भरतीच्या वेळी समुद्राच्या पाण्यात अडकून वाहून जाण्याच्या स्थितीत पोहोचली. कार हळूहळू समुद्राच्या दिशेने सरकत असल्याचे लक्षात येताच स्थानिक ग्रामस्थांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. सर्वांनी एकत्रित प्रयत्न करत कारला धक्का देऊन सुरक्षितपणे किनाऱ्यावर आणले. ग्रामस्थांच्या प्रसंगावधानामुळे मोठे आर्थिक नुकसान टळले.
उमरगा तालुक्यात गुरुवारी मान्सूनपूर्व पावसाने जोरदार हजेरी लावली. ढगांच्या गडगडाटासह आणि वादळी वाऱ्यांसह झालेल्या पावसाने मुरूम व तुगाव परिसराला चांगलेच झोडपून काढले. दिवसभर कडक उन्हामुळे नागरिक हैराण झाले होते. मात्र दुपारनंतर वातावरणात अचानक बदल होऊन ढग दाटून आले आणि सायंकाळी साडेपाचच्या सुमारास जोरदार पावसाला सुरुवात झाली. या पावसामुळे उकाड्यापासून दिलासा मिळाला असून वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. शेतकऱ्यांनीही शेतीपूर्व तयारीला वेग दिला आहे.
धाराशिव-बीड-लातूर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीसाठी दाखल करण्यात आलेल्या उमेदवारी अर्जांची छाननी आज पार पडली. छाननीनंतर दाखल झालेले सर्व 14 अर्ज वैध ठरले असून एकूण 9 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात कायम आहेत.महायुतीचे उमेदवार बसवराज पाटील यांनी सर्वाधिक 4 उमेदवारी अर्ज दाखल केले होते. काँग्रेसचे महेश देशमुख यांनी 2 अर्ज, तर अर्चना विनोद गंगणे यांनी 2 अर्ज दाखल केले होते.उर्वरित उमेदवारांनी प्रत्येकी एक अर्ज भरला होता.निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या उमेदवारांमध्ये अहमदखान सय्यद नूर राज सय्यद,सहालबिन आमेर चाऊस, सचिन भारतराव पवार, संजय पांडुरंगजी मुंदडा, महालिंगे मिलिंद गणपती आणि शरद रामभाऊ यादव यांचा समावेश आहे.आता उद्या उमेदवारी अर्ज माघारी घेण्याची अंतिम मुदत असून त्यानंतर निवडणुकीचे अंतिम चित्र स्पष्ट होणार आहे. कोण माघार घेणार, कोण बंडखोरी कायम ठेवणार आणि अखेर किती उमेदवार मैदानात राहणार याकडे लक्ष लागले आहे.भाजपचे बसवराज पाटील विरुद्ध काँग्रेसचे महेश देशमुख अशी थेट लढत होणार का? उद्याच्या माघारीनंतर चित्र स्पष्ट होणार
- निवडणूक प्रक्रियेत अडथळा आणल्याप्रकरणी खा. प्रणिती शिंदे यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची भाजप आ. देवेंद्र कोठे यांची मागणी
- खा. प्रणिती शिंदे यांनी निवडणूक प्रक्रियेमध्ये अडथळा आणल्याचा प्रशासनावर दबाव टाकल्याचा आ. देवेंद्र कोठेंचा आरोप
- भाजपने काँग्रेसवर घेतलेल्या आक्षेपाबाबत निर्णय घेण्यापूर्वी प्रशासनावर लोकप्रतिनिधी म्हणून दबाव टाकल्याचा खा. प्रणिती शिंदे यांच्यावर आरोप
- त्यामुळे आता खासदार प्रणिती शिंदेंवर गुन्हा दाखल होणार का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे
साक्री तालुक्यातील म्हसदी परिसरासह वसमार शिवारात कपाशी लागवडीच्या कामांना कमालीचा वेग आला आहे, उन्हाचा चटका कायम असला तरी खरीप हंगामाच्या पूर्वतयारीत व्यग्र असलेला शेतकरी आता प्रत्यक्ष पेरणी आणि लागवडीच्या मैदानात उतरला असून, संपूर्ण शेतशिवारे मजूर आणि शेतकऱ्यांच्या लगबगीने गजबजून गेली आहेत,
- ९ उमेदवारांचे एकूण १४ अर्ज होते दाखल, अर्ज छाननीत सर्व अर्ज ठरले पात्र
- शिंदेंची शिवसेना आणि इस्लाम पार्टी असे दोन राजकिय पक्ष आणि उर्वरित अपक्ष अर्ज दाखल
- अर्ज माघारीच्या मुदतीपर्यंत कोण, कोण? माघार घेणार याकडे लक्ष
शेतकऱ्यांना पुरेसा व नियमित वीजपुरवठा मिळत नसल्याने संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी आज ठाकरे सेनेच्या पदाधिकाऱ्यांसोबत बाम्हणे येथील महावितरण कार्यालयावर धडक देत ठिय्या आंदोलन केले आहे, निवेदन स्वीकारण्यासाठी संबंधित अभियंता वेळेवर उपस्थित नसल्याने संतापलेल्या शेतकऱ्यांनी थेट अभियंत्यांच्या दालनातच ठाण मांडत जोरदार घोषणाबाजी केली,
राज्यात राष्ट्रीय बाजार समिती आजपासून लागू करण्यात आली
पणनमंत्री जयकुमार रावल यांची राष्ट्रीय महत्वाचा बाजारचे अध्यक्षपदी नेमणूक
जयकुमार रावल यांनी आज नवी मुंबईतील एपीएमसी बाजार समितीमध्ये पदभार स्वीकारला..
- नाशिकमध्ये मॉन्सूनपूर्व पावसाच्या सरी
- शहरात मॉन्सूनपूर्व पावसाला सुरुवात
- अचानक आलेल्या पावसाने नागरिकांची तारांबळ
- सकाळपासून शहरात होते ढगाळ वातावरण
- दुपारच्या सुमारास मॉन्सूनपूर्व पावसाच्या जोरदार सरी
- पावसाच्या सरींमुळे उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना काहीसा दिलासा
शेगाव तालुक्यातील लासुरा बुद्रुक येथे गुरांच्या गोठ्याला लागलेल्या भीषण आगीत शेती साहित्य व पशुखाद्य जळून खाक झाले. काल रात्री लागलेल्या या आगीने वादळी वाऱ्यामुळे उग्र रूप धारण केले. ग्रामस्थांनी धैर्याने आग विझविण्याचे प्रयत्न केले. त्यानंतर शेगाव अग्निशामक दल घटनास्थळी दाखल होऊन जवान व गावकऱ्यांच्या मदतीने आगीवर नियंत्रण मिळवले. दरम्यान, अग्निशामक वाहनातील प्रेशर पाईप गळतीमुळे आग विझविण्यास विलंब झाल्याने ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली. घटनास्थळी पोलीस प्रशासन, सरपंच, पोलीस पाटील व ग्रामस्थांनी मदतकार्य केले.
अहिल्यानगर जिल्हास्तरीय मेळावा...
शिवसेना नेते खासदार संजय राऊत, माजी खासदार चंद्रकांत खैरे, अंबादास दानवे, संपर्कप्रमुख सुनील शिंदे यांची उपस्थिती
मेळाव्यासाठी जिल्हाभरातून कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती
पक्षवाढीसह SIR बाबत कार्यकर्त्यांना केलं जाणार मार्गदर्शन
परदेशात असल्याने शिर्डीचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे मेळाव्यासाठी अनुपस्थित
नाशिकच्या चांदवड येथील मुंबई-आग्रा महामार्गावर एसटी महामंडळाच्या बसला आग
महामार्गावरून ही बस मालेगावकडून नाशिक कडे जात असताना चांदवड कडील घाट उतरून येत असताना खोकड तालावा जवलिळ निसर्ग हॉटेल समोर ही घटना घडली
बस मधून धूर येऊ लागतात चालकाने प्रसंगवधान दाखवत बस बाजूला उभी करत गाडीतील प्रवाशांना खाली उतरवल्याने मोठा अनर्थ टळला.
जळगाव विधान परिषदेसाठी 16 उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले असून यापैकी 16 उमेदवारी अर्ज वैध ठरलेले आहेत
आज उमेदवारांची छाननी प्रक्रिया पार पडली असून यापैकी ज्या अर्जात त्रुटी होत्या त्या उमेदवारांना लेखी सूचना देण्यात आल्या असून छाननी अंती 16 अर्ज वैध ठरले आहेत
भाजपा, महाविकास आघाडी, शिवसेना शिंदे गट बंडखोर ,यांच्यात आता निवडणूक रंगणार आहे
- पेट्रोल-डिझेल दरवाढ व खतांच्या वाढलेल्या किमतींवरून सरकारला घेरले
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात आंदोलन करून जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा
- शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याची युवक काँग्रेसची जोरदार मागणी
- सत्तेपूर्वी दिलेली आश्वासने पूर्ण करण्याची सरकारकडे मागणी
- सरकारविरोधात युवक काँग्रेस व काँग्रेस पदाधिकाऱ्यांची जोरदार घोषणाबाजी
- मोठ्या संख्येने कार्यकर्ते सहभागी; आंदोलनामुळे परिसरात राजकीय वातावरण तापले
इंधन दरवाढीच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने आज कोल्हापुरात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मूक निदर्शने करण्यात आली. केंद्र व राज्य सरकारच्या धोरणांविरोधात घोषणाबाजी करत कार्यकर्त्यांनी तीव्र संताप व्यक्त केला. यावेळी निवेदन देण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात जाण्याचा प्रयत्न कार्यकर्त्यांनी केला. मात्र पोलिसांनी त्यांना रोखल्याने वातावरण तापले. पोलिस आणि कार्यकर्त्यांमध्ये जोरदार शाब्दिक बाचाबाची झाली.
बीडच्या पाटोदा तालुक्यातील गहिनीनाथ गड परिसरातील चिखली येथे रात्री वादळीवाऱ्यासह प्रचंड गारांचा पाऊस झाल्याने चिखली येथील शेतकरी दिनकर लाड यांनी रखरखत्या उन्हात मोठ्या कष्टांनी थेंब थेंब पाण्याचा नियोजन करून दुष्काळी भागात मराठवाड्यातील पहिले थाई पांढरे जांभूळचे पिक दर्जेदार उत्पादन घेतले होते.
भाजपच्या नगरसेवक सूचक अनुमोदक असलेल्या फॉर्म व्यतिरिक्त गणेश गीते आज पुन्हा नव्याने फॉर्म भरणार
गणेश गीते नवीन फॉर्म भरण्यासाठी निवडणूक कार्यालयामध्ये दाखल
गणेश गीते मालेगाव मुस्लिम पार्टीच्या मदतीने आणि मालेगावच्या काही नगरसेवकांच्या सूचक, अनुमोदक सह्या असलेला फॉर्म घेऊन दाखल
नाशिक विधान परिषद निवडणुकीमध्ये नवा ट्वीस्ट
गणेश गीते यांना भाजपकडून उमेदवारी न मिळाल्याने आणि ही जागा शिंदे यांच्या शिवसेनेला सुटल्याने गणेश गीतेंची नवी खेळी
दोन भामट्यांनी पोलिस असल्याचे सांगून एका व्यक्तीची फसवणूक करत 8 तोळे सोन्याचे दागिने लंपास केल्याची घटना चंद्रपूर शहरातील भानापेठ वॉर्ड परिसरात उघडकीस आली आहे. शहर पोलिसांनी तक्रार नोंदवून घेत परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपींचा शोध सुरू केला आहे.
विषारी दारूमुळे पिंपरी चिंचवड शहरात 11 जणांचा बळी गेल्या नंतर पिंपरी चिंचवड शहर पोलिसांनी आता अवैध दारू तयार करणारे l दारू वाहतूक करणारे आणि विक्री करणाऱ्या विरोधात कारवाईचा धडाका सुरू केला आहे.
खासदार सुप्रिया सुळे पुण्यातील काँग्रेस भवन मध्ये
काँग्रेस नगरसेवकांशी सुप्रिया सुळे साधणार संवाद
विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुप्रिया सुळे यांची काँग्रेस भवनात बैठक
पुणे विधान परिषदेची जागा महाविकास आघाडी कडून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष लढणार
याच पार्श्वभूमीवर पुणे महानगरपालिकेतील काँग्रेस नगरसेवकांशी सुप्रिया सुळे साधणार संवाद
पुणे महानगरपालिकेत काँग्रेसचे एकूण १५ नगरसेवक
विक्रम काकडे (Vikram Kakde) आणि सुनील टिंगरे (Sunil Tingare) या दोघांनी विधान परिषदेचा अर्ज भरला आहे
पार्थ पवारांच्या भेटीसाठी दोन्ही उमेदवार जिजाई वर
पार्थ पवार सुनील टिंगरे यांची नाराजी दूर करणार का?
परभणी जिल्ह्यात अवकाळी पाऊस, वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटामुळे मोठे नुकसान झाले आहे. परभणी तालुक्यातील इंदेवाडी येथे घराची भिंत कोसळून ११ वर्षीय मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. गंगाखेड तालुक्यातील गौंडगाव येथे वीज कोसळून शेतकऱ्याचा बैल आणि गाय दगावली असून मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.
आगामी विधान परिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुप्रिया सुळे घेणार काँग्रेस नगरसेवकांची भेट
पुणे महापालिकेत काँग्रेस चे १५ नगरसेवक
काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या नगरसेवकांची घेणार एकत्र बैठक
आयात शुल्कातील बदलांमुळे देशांतर्गत कापूस बाजारावर मोठा परिणाम झाला असून कापसाचे दर घसरल्याने शेतकरी वर्ग चिंतेत सापडला आहे. अवघ्या दहा दिवसांपूर्वी 9 हजार 500 ते 10 हजार रुपये प्रतिक्विंटल दराने विकला जाणारा कापूस आता आठ हजार ते साडेआठ हजार रुपयांपर्यंत खाली आला आहे.त्यामुळे नव्याने येणाऱ्या खरीप हंगामातील कापूस उत्पादकांना आपला माल कवडीमोल भावात विकावा लागण्याची भीती निर्माण झाली आहे.
सावंतवाडी तालुक्यातील सांगेली येथे तेरेखोल नदीत गाळ काढण्याच्या नावाखाली बेकायदेशीररित्या वाळू व दगडगोटे उत्खनन होत असल्याचा आरोप करत माडखोल ग्रामस्थांनी माडखोल ग्रामपंचायती बाहेर उपोषण छेडले आहे. महसुल प्रशासनाच्या आशीर्वादाने हा सर्व प्रकार सुरू असून गाळ काढण्याच्या नावाखाली नदीतील वाळू, दगडगोटे क्रश करून बांधकामासाठी अनधिकृतरित्या विकण्याचा घाट वाळू माफियांनी घातला असल्याचा आरोप माडखोल ग्रामस्थांनी केला आहे. माडखोल येथे नदीतील गाळ काढण्याची मागणी असताना तो न काढता सांगेली येथे गौण खनिज मिळत असल्यामुळे त्याठिकाणी अनधिकृत उत्खनन होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. सावंतवाडीचे तहसीलदार यासर्व प्रकाराकडे डोळेझाक करत असून अनधिकृत वाळू उत्खनन करणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
बदलापूर शहरातील पूर्व आणि पश्चिमेला जोडणाऱ्या मुख्य वीर सावरकर उड्डाणपुलावर आज सकाळच्या सुमारास प्रचंड वाहतूक कोंडी झालीय. एकाच वेळी दोन वाहनांचे टायर फुटल्यानं दोन्ही बाजूला वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. सकाळच्या अत्यंत गजबजलेल्या वेळी उड्डाणपुलावर एक टँकर आणि एक दुधाची गाडी जात होती या दोन्ही वाहनांचं टायर फुटल्यानं दोन्ही मोठी वाहनं पुलाच्या मध्यभागीच अडकून पडली. पूर्व आणि पश्चिमेला जोडणारा हा एकमेव पूल असल्याने, दोन्ही बाजूंची वाहतूक पूर्णपणे कोलमडलीय. त्यामुळे रस्त्यावर वाहनांच्या लांब रांगा लागल्या असून, अनेक वाहनचालक गेल्या काही तासांपासून पुलावर अडकून पडले आहेत. यामुळे वाहन चालकांना तीव्र मनस्ताप सहन करावा लागत आहे.
कोयना धरणाच्या जलाशयातील पाणीपातळी कमालीची घटल्यामुळे धरणाचे विस्तीर्ण बॅकवॉटर सध्या ओसाड पडले आहे. मात्र, या जलसंकटासोबतच एक ऐतिहासिक ठेवा पुन्हा एकदा समोर आला आहे. पाणी ओसरल्यामुळे १९५२ पूर्वीच्या ऐतिहासिक जुन्या कसबा पेठ बामनोली गावाचे अवशेष आता उघडे पडले असून ते पाहण्यासाठी पर्यटक या परिसरात येऊ लागले आहेत. त्या ठिकाणचा पर्यटनाचा व्यवसाय हा बोटिंग असून पाणीपातळी कमी झाल्यामुळे हा सर्व व्यवसाय ठप्प झाला
अखंड महाराष्ट्राच कुलदैवत असणाऱ्या जेजुरीत येणाऱ्या भाविकांना आता भंडारा आमच्याकडूनच घ्या अशी सक्ती करता येणार नाही जर कोणी व्यापाराने भंडारा आमच्याकडूनच घ्या अशी सक्ती केली तर तो खंडणीचा प्रकार समजला जाईल असा इशारा जेजुरी पोलिसांनी दिलाय.
जेजुरी मध्ये "पार्किंग आणि भंडारा घेण्याच्या सक्तीवरून भाविक व स्थानिकांमध्ये वारंवार वाद होत असल्याच्या पार्श्वभूमीवर प्रशासन आणि ग्रामस्थांची संयुक्त बैठक घेण्यात आली. यावेळी पोलीस अधिकारी दीपक वाकचौरे यांनी हा इशारा दिला आहे.
बदलापूर रेल्वे स्थानकात एका मोबाईल चोराला प्रवाशांनी बेदम चोप दिलाय. त्याचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल होतोय. मात्र मोबाईल चोरी करणारी टोळी फरार झालीय. बदलापूर रेल्वे स्थानकातून दररोज हजारो प्रवासी मुंबईकडे ये जा करत असतात. गर्दीचा फायदा घेत मोबाईल चोरांच्या टोळीकडून प्रवाशांचे मोबाईल लांबवले जातात. मात्र काल एक मोबाईल चोर प्रवाशांच्या हाती लागला. त्यानंतर प्रवाशांनी त्याची चांगलीच धुलाई केली आणि चोरट्याला पोलिसांच्या स्वाधीन केलं. पोलीस आता मोबाईल चोरांच्या टोळीचा शोध घेत आहेत.
कांद्याला कवडीमोल दर मिळत असल्याने उत्पादन खर्चही निघत नसल्याच्या संतापातून शेतकरी आज मंचर येथे पुणे-नाशिक महामार्गावर रास्तारोको आंदोलन करणार आहेत. या आंदोलनात आमदार रोहित पवार सहभागी होणार असून, आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी सरकारच्या कांदा धोरणावर जोरदार टीका केली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.