जंगलासह आसपासच्या परिसरात सापांचा वावर हमखास पाहायला मिळतो. नाग, साप, किंग कोब्रा यांच्या एकाच दंशाने व्यक्तीचा मृत्यू होतो. घरात, रस्त्यांवर किंवा एखाद्या झाडावर साप फिरत असल्याचं तुम्ही कधीनाकधी पाहिलंच असेल. अशात सध्या एक व्हिडीओ व्हायरल होतोय ज्यात साप थेट रिक्षावर फनाकाढून बसला आहे. (Latest Marathi News)
रिक्षाच्या मागे साप आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. ही घटना बदलापूरमधील आहे. बदलापूर रेल्वे स्थानकाबाहेर उभ्या असलेल्या रिक्षा स्टँडवर ही घटना घडलीये. यावेळी सर्प मित्रांना बोलावून नागाला निसर्ग अधिवासात सोडण्यात आलं.
सापाला पाहिल्यावर अनेकांची घाबरगुंडी झाली. या घटनेचा व्हिडीओ देखील काहींनी सोशल मीडियावर पोस्ट केलाय. यावर नेटकऱ्यांनी मजेशीर कमेंट्सचा वर्षाव केला आहे. एकाने यावर लिहिलंय की, सापाला संपूर्ण बदलापूर फिरायचं होतं त्यामुळे तो थेट रिक्षावर फना काढून बसला होता. @ABHIKUS44168075 या ट्विटर अकाउंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे.
भयंकर सापाचे आजवर अनेक व्हिडीओ व्हायरल झालेत. यातील काही व्हिडीओ तर अंगावर शहारे येतील असे आहेत. काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर साप आणि मुंगूस यांच्यातील मारामारीचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. आपला जीव वाचवण्यासाठीची सापाची धडपड त्यात दिसत होती.
यासह काही सर्पमित्रांचे देखील व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतात. काही व्यक्ती मुद्दाम खोडकरपणा करतात आणि असं वागणं त्यांच्या जिवावर बेततं. एक मद्यपी व्यक्ती साप हातात पकडून दुचाकीवरून जात होता. यावेळी सापाने त्याला दंश केला. सापाने तीन चार वेळा दंश केला तरी त्याने साप सोडला नाही. पुढे जागेवरच त्याचा मृत्यू झाला. या घटनेचा व्हिडीओ देखील बराच व्हायरल झाला होता.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.