Diwali Sweet Safety : दिवाळीच्या मिठाईत भेसळ तर नाही ना? 'या' ३ सोप्या ट्रिक्सने ओळखा

Shreya Maskar

दिवाळी

दिवाळी म्हटले की, बर्फी, मिठाई आलीच. मिठाई खरेदी करताना ती भेसळयुक्त नाही ना हे तपासा. मिठाई खरेदी करताना कोणते घटकांचा विचार करावा, जाणून घेऊयात.

Diwali | pinterest

मिठाईचा रंग

पेढे, बर्फी, लाडूंचा रंग अस्वाभाविकपणे चमकदार किंवा एकसारखा भडक दिसत असल्यास सावध राहा. यात खाण्याचा रंग अतिरिक्त प्रमाणात टाकलेला असू शकतो. जो आरोग्यास घातक ठरतो.

color of sweets | pinterest

खवा- माव्याचा वास

ताजा खवा सामान्यतः दुधासारखा सौम्य वास देतो. आंबट, कुबट किंवा विचित्र वास येत असल्यास तो खाऊ नका.

चांदीचा वर्ख

मिठाईवरील वर्ख अन्नासाठी सुरक्षित आहे का, याची खात्री करा. दिसण्यावरून चांदी आणि ॲल्युमिनियमचा वर्ख नेहमी वेगळा ओळखता येत नाही. शंका असल्यास वर्ख असलेली मिठाई घेणे टाळा.

Silver | pinterest

मिठाई कशी स्टोर केली पाहा

माशा बसणारी, धूळ साचलेली किंवा अस्वच्छ ट्रेमध्ये ठेवलेली मिठाई खरेदी करू नका. मिठाई झाकून ठेवली आहे का, हे पाहा.

how sweets are stored | pinterest

दुकानातील स्वच्छता पाहा

मिठाई हाताळताना स्वच्छता राखली जाते का, साठवण योग्य आहे का आणि थंड ठेवणे आवश्यक असलेले पदार्थ योग्य तापमानात ठेवले आहेत का, हे तपासा.

Check the cleanliness of the shop | pinterest

एक्सपायरी डेट तपासा

पॅकबंद मिठाईवर उत्पादन किंवा पॅकिंगची तारीख, एक्सपायरी डेट, घटकांची माहिती आणि FSSAI परवाना क्रमांक तपासा. सुट्या मिठाईच्या ट्रेवरही उत्पादन व Best Before तारीख पाहा.

Check the expiry date | pinterest

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या, डॉक्टरांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

Note | pinterest

NEXT : तुमच्या किचनमधील 'हे' ५ पदार्थ देतात रक्तातील साखरेला बुस्ट, आजच खाणे करा बंद

Diabetes | AI PHOTO
येथे क्लिक करा...