Shruti Vilas Kadam
हा घरगुती हेअर मास्क तयार करण्यासाठी तुम्हाला फक्त दोन गोष्टी लागतील. ४ चमचे ताजे कोरफड जेल,१ चमचा खोबरेल तेल
एका स्वच्छ वाटीत ४ चमचे कोरफड जेल घ्या. त्यामध्ये १ चमचा खोबरेल तेल घालून दोन्ही घटक व्यवस्थित मिसळा. खोबरेल तेल घट्ट झाले असल्यास ते किंचित कोमट करून वापरू शकता.
केसांचे छोटे भाग करा आणि बोटांच्या टोकांनी किंवा स्वच्छ ब्रशने टाळूवर आणि संपूर्ण केसांवर हलक्या हाताने लावा. टाळूवर जोरात घासू नका. मिश्रण लावल्यानंतर केस हलक्या हाताने विंचरा.
कोरफड जेल केसांना ओलावा देण्यास मदत करू शकते, तर खोबरेल तेल केसांमधील प्रोटीनचे नुकसान कमी करण्यास मदत करते. त्यामुळे कोरडे आणि निस्तेज केस मऊ वाटू शकतात.
केस विस्कटलेले आणि फ्रिझी दिसत असतील, तर खोबरेल तेलामुळे केस गुळगुळीत वाटू शकतात. कोरफड जेलमुळे केसांना ओलावा मिळण्यास मदत होते. त्यामुळे केस विंचरणे सोपे होते.
कोरडे केस निस्तेज दिसू शकतात. खोबरेल तेलाचा योग्य प्रमाणात वापर केल्यास केस अधिक चमकदार आणि मऊ होतात.
हा मास्क केसांना लावल्यानंतर साधारण २० ते ३० मिनिटे ठेवा. त्यानंतर सौम्य शॅम्पूने केस धुवा. सुरुवातीला आठवड्यातून एकदा वापरून पाहू शकता. केसगळती जास्त असल्यास त्वचारोगतज्ज्ञांचा सल्ला घ्या.
ही माहिती सामान्य ज्ञानावर आधारित आहे. साम टीव्ही या माहितीची पूर्ण सत्यता किंवा अचूकतेची हमी देत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.