Sakshi Sunil Jadhav
अॅलोवेरा लावल्याने त्वचेला फायदा होतो हे सर्वांनाच माहित असतं. पण त्याने किरकोळ जळजळ किंवा लालसरपणा कमी करायला मदतही होते.
अॅलोवेरा लावल्याने तुमची ड्राय स्कीन लगेचच हायड्रेटेड होते. पण त्यासाठी फक्त अॅलोवेराच वापरायचं असतं असं नाही.
अॅलोवेरा जेल हलकं असल्यामुळे तेलकट त्वचा असणाऱ्यांना त्याचा सर्वात जास्त फायदा होतो.
बऱ्याचजा चेहऱ्यावर मुरूम असतील तर काही प्रमाणात पूरक ठरू शकतो. मात्र, मुरुम पूर्णपणे बरे करण्यासाठी तो एकटाच पुरेसा असल्याचे ठोस पुरावे नाहीत.
अॅलोवेरा जेल काळे डाग किंवा सुरकुत्या कमी करायला मदत करतात. पण जास्त समस्या असतील तर डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
अॅलोवेराच्या पानातला पिवळसर रस कधी-कधी तुमच्या त्वचेला त्रास देऊ शकतो. त्यामुळे योग्य जेलची निवड करा.
जेल खरेदी करताना सुगंध, कृत्रित रंग आणि त्रासदायक घटक नसलेले प्रोडक्ट निवडा.
अॅलोवेरा जेल प्रत्येक त्वचेसाठी सारखाच परिणाम देत नाही. एक्झिमा, रोझेशिया किंवा संवेदनशील त्वचा असल्यास नियमित वापर करण्यापूर्वी त्वचारोगतज्ज्ञांचा सल्ला घ्या.