Snake Viral Video  Saam TV
व्हायरल न्यूज

Snake Viral Video : बापरे बाप! बेडवर थेट गादीखाली लपला होता साप; तरुण झोपायला गेला अन्... VIDEO व्हायरल

Snake Hide in Bed : साप मानवी वस्तीत येत असल्याचे प्रमाण वाढले आहे. सापाचे अनेक व्हिडिओ देखील व्हायरल झाले आहेत. आता देखील सोशल मीडियावर असाच एक काळजास धस्स करणारा व्हिडिओ समोर आलाय.

Ruchika Jadhav

सोशल मीडियावर सतत काही ना काही व्हिडिओ व्हायरल होताना दिसतात. पावसात आणि उन्हाळ्यात देखील मानवी वस्तीत साप येतात. गेल्या काही दिवसांपासून साप मानवी वस्तीत येत असल्याचे प्रमाण वाढले आहे. सापाचे अनेक व्हिडिओ देखील व्हायरल झाले आहेत. आता देखील सोशल मीडियावर असाच एक काळजास धस्स करणारा व्हिडिओ समोर आलाय.

व्हिडिओमध्ये दिसत आहे की, एक साप थेट बेडवर असलेल्या गादीखाली लपून बसला आहे. कुटुंबातील व्यक्ती येथे झोपण्यासाठी गेले तेव्हा त्यांना सुदैवाने हा साप दिसला. गादीखाली साप असल्याचं समजताच कुटुंबातील व्यक्तींच्या काळजात अगदी धडकी भरली. त्यांनी लगेचच एका सर्प मित्राला बोलावले.

व्हिडिओमध्ये दिसत आहे की, सर्प मित्राला हे समजताच तो या ठिकाणी पोहचला आहे. येथे आपल्यावर त्याने एका हातात स्नेक स्टिक पकडलीये. सापाला पकडण्यासाठी तो प्रयत्न करत आहे. सुरुवातीला हा व्यक्ती बेडवर असलेली पहिली गादी उचलतो त्या खाली साप आहे का तपासतो. मात्र साप तेथे नसतो, मग सावकाश आणि सावधानपणे तो बेडवर असलेली दुसरी गादी उचलतो.

दुसरी गादी उचलताच त्याखाली त्याला साप लपलेला दिसतो. गादीखाली सापाने स्वताचे वेटोळे केलेले दिसत आहे. स्नेक स्टिकच्या मदतीने नंतर तो सापाला पकडतो आणि निसर्ग अधिवासात नेऊन सोडतो. सापाचा हा व्हिडिओ कुटुंबातील व्यक्तींनी आपल्या फोनमध्ये रेकॉर्ड केला आहे. सदर व्हिडिओ आता सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय. @shyam_govindsar या इंस्टाग्राम अकाउंटवर व्हिडिओ पोस्ट करण्यात आला आहे.

उन्हाळ्यात देखील असाच एक थरारक व्हिडिओ समोर आला होता. त्या व्हिडिओमध्ये चक्क किंग कोब्रा साप घरात शिरला होता. इतकेच नाही तर हा किंग कोब्रा थेट घरातील भांडी ठेवण्यासाठी असलेल्या मांडणीमध्ये जाऊन बसला होता. तेव्हा देखील सर्प मित्रांच्या मदतीने सापाला निसर्ग अधिवासात सोडण्यात आलं होतं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mangal Gochar 2025: सप्टेंबर महिन्यात पालटणार 'या' राशींचं नशीब; मंगळाच्या गोचरने होणार लाभ

Maharashtra Live News Update: संगमेश्वर माखजन बाजारपेठेला पुन्हा एकदा पुराचा धोका

Ganeshotsav 2025: यंदा गणेशोत्सव कधी आहे? जाणून घ्या तारीख

Khopoli Ghat Traffic : खोपोली घाटात १०० हून अधिक कार थांबल्या, जाणून घ्या धक्कादायक कारण

Mobile Deals: ३००० पेक्षा कमी किंमतीत मोबाईल फोन, YouTube आणि JioHostar पाहण्याची देखील सुविधा

SCROLL FOR NEXT