Snake Under Pillow x
व्हायरल न्यूज

Snake Under Pillow : बाप रे बाप, उशीखाली आढळला भला मोठा साप; व्हायरल व्हिडीओ पाहून तुम्हालाही धडकी भरेल

Viral Video : एका व्यक्तीच्या घरातील बेडच्या उशीखाली साप आढळल्याने मोठी खळबळ उडाली. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ही घटना नागपूर शहरामध्ये घडल्याचे म्हटले जात आहे.

Yash Shirke

पराग ढोबळे, साम टिव्ही, प्रतिनिधी

यंदा मे महिन्यातच पावसाला सुरुवात झाली आहे. पाऊस पडायला लागल्याने बेडूक, साप असे प्राणी जमिनीबाहेर येत असल्याचे पाहायला मिळते. पावसाळ्यात सापाच्या बिळामध्ये पाणी शिरते. त्यामुळे ते बिळातून बाहेर येतात आणि त्यांच्या शरीराचे तापमान स्थिर ठेवण्यासाठी उबदार जागा शोधतात. नागरी वस्त्यांचे प्रमाण वाढल्याने अनेकांच्या घरात देखील साप दिसतात. नागपूरमध्ये एका व्यक्तीच्या बेडवर साप आढळल्याची माहिती समोर आली आहे.

नागपूर शहरातील महाजनवाडी येथील जयस्वाल नगरमध्ये राहणारे पंकज कुवरे यांच्या घराच्या बेडवर उशीखाली विषारी साप आढळला. प्रसंगावधान राखत पंकज कुवरे यांनी सर्प मित्रांना कॉल करुन बोलवून घेतले. सर्प मित्र आकाश मेश्राम यांनी शिताफीने विषारी सापाला पकडले आणि एका प्लास्टिकच्या बरणीमध्ये ठेवले. या संपूर्ण घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पंकज कुवरे यांच्या घरातील सदस्य बेडवर झोपण्यासाठी गेले होते, तेव्हा त्यांना उशीखाली काहीतरी हालचाल होत असल्याचे लक्षात आले. उशी उचलून बघितली असताना उशी खाली विषारी साप दिसून आला. त्यानंतर पंकज यांनी वेळ न दवडता सर्पमित्राला संपर्क केला. घरात बेडवर उशीखाली विषारी साप आढळल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

पंकज कुवरे यांच्या घरातील बेडजवळ असलेल्या खिडकीतून हा विषारी साप आत शिरल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. पावसाळ्यामध्ये सापांच्या बिळात पाणी शिरते, तेव्हा ते उबदार जागा शोधत मनुष्यवस्तीमध्ये प्रवेश करतात. त्यामुळे पावसाळ्यात नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन सर्पमित्रांनी केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dhule Rain: अवकाळीचा फटका 'लालपरी'ला, एसटी बसला लागली गळती; VIDEO व्हायरल

8th Pay Commission: 8व्या वेतन आयोगाबाबत मोठी अपडेट, केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगारात 34% ने वाढ?

महाराष्ट्रात बदल्याचा धडाका कायम; आता २५ बड्या IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या, कुणाची कुठे नियुक्ती?

Pune : पुणे बनतंय ड्रग्ज कॅपिटल; अल्पवयीन मुलीमुळे ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश

Maharashtra Politics: राज्याच्या राजकारणात आणखी एक भूकंप? राष्ट्रवादी-शिंदेसेनेचे 50 आमदार भाजपात जाणार, बड्या नेत्याचा दावा

SCROLL FOR NEXT