Snake and Mongoose Video Saam TV
व्हायरल न्यूज

Snake and Mongoose Video: रस्त्याच्या मधोमध साप आणि मुंगूस भिडले; थरारक हाणामारीचा VIDEO व्हायरल

Snake and Mongoose Fight Viral Video: या दोघांची झूंज सुरू होते. स्वत:ला वाचवण्यासाठी साप तेथून पळण्याचा प्रयत्न करतो.

Ruchika Jadhav

Viral Video:

सापाला सगळेच घाबरतात आणि त्याच्यापासून दूर पळतात. सापाला कोणीच हारवू शकत नाही, मात्र मुंगूस सापाला ठार करतो. त्यामुळे साप नेहमीच मुंगूसला घाबरतो. अशात सध्या सोशल मीडियावर एक मुंगूस आणि सापाच्या जुगलबंदीचा व्हिडीओ जोरदार व्हायरल झालाय. भर रस्त्यात या दोघांमध्ये जुंपली आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, रस्त्याच्या अगदी मधोमध एक साप आलाय. साप पाहून रस्त्याच्या दोन्ही बाजूंना वाहनांच्या रांगा लागतात. साप गेल्यावर आपण येथून जाऊ या विचाराने वाहने थांबलेली असतानाच एक मुंगूस सापाजवळ येतो. नंतर या दोघांची झूंज सुरू होते. स्वत:ला वाचवण्यासाठी साप तेथून पळण्याचा प्रयत्न करतो. मात्र मुंगूस सापाला पकडतोच.

दोघांच्या झटापटीचा थरारक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झालाय. या व्हिडीओमध्ये शेवटी मुंगूसच जिंकलेला दिसतोय. @drqayumiitk या ट्वीटर अकाउंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आलाय. हा व्हिडीओ पोस्ट करत त्यांनी लिहिलंय की, व्हिडीओ पाहून मला फार छान वाटले. कारण हा निसर्गाचा नियम आहे आणि कोणीही या प्राण्यांमध्ये आले नाही हे चांगलं आहे, असं यात लिहिलंय.

व्हिडीओ उत्तर प्रदेशच्या हरदोई येथील असल्याचं काही माध्यमांवर सांगण्यात आलंय. रस्त्यावर असलेल्या व्यक्तींपैकी काहींनी हा थरार आपल्या फोनमध्ये कैद केलाय. नेटकऱ्यांनी देखील या व्हिडीओवर भन्नाट कमेंट केल्यात.

सोशल मीडियावर प्राण्यांचे आजवर अनेक व्हिडीओ व्हायरल झालेत. यामध्ये प्राण्यांमधील प्रेम आणि राग असे दोन्ही भाव पाहायला मिळतात. काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर एक गाय आणि सापाचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. या व्हिडीओमध्ये गाय सापाला प्रेमाने कीस करताना दिसतेय. सापाचा गायीला दंश झाला असता तर गाय दगावली असती. मात्र गाय फार प्रेमाने सापाला कीस करते त्यामुळे सापही तिला दंश करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

उद्धव ठाकरेंचा 'जय हिंद, जय महाराष्ट्र, जय गुजरात'चा VIDEO कुठला अन् कधीचा? महाराष्ट्र की गुजरात? वाचा सविस्तर...

Shubman Gill: बाल बाल बचावला गिल; ब्रूकनं मारलेला चेंडू लागला थेट शुबमनच्या डोक्याला|Video Viral

Maharashtra Live News Update: पंतप्रधान नरेंद्र मोदी ऑर्डर ऑफ द रिपब्लिकने सन्मानित

Badlapur Firing : बदलापूर गोळीबार प्रकरणाला नवं वळण; गाळीबारामागे शिवसेना पदाधिकाऱ्याचा हात?

Eknath Shinde : 'जय गुजरात'च्या घोषणेनंतर एकनाथ शिंदेंचं स्पष्टीकरण, उद्धव ठाकरेंचा VIDEO दाखवत विरोधकांना प्रत्युत्तर

SCROLL FOR NEXT