smart pen that answers questions Saam Tv News
व्हायरल न्यूज

Smart Pen : एक स्मार्ट पेन, कामं अनेक! तुमच्या प्रश्नांची उत्तरं देणारा स्मार्ट पेन, सोशल मिडियावर स्मार्ट पेनची चर्चा

Smart Pen : एका स्मार्ट पेनची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. हा पेन क्षणार्धात प्रश्नांची उत्तर तर देतोच... त्यासोबत भाषांतर करणं, पुस्तक वाचण्यासारखी कामही झटपट करतो. पाहूयात एक खास रिपोर्ट...

Prashant Patil

सुप्रीम मस्कर, साम टिव्ही

खिशाला पेन नाही असा माणूस सापडणे कठीण. अनेकजण तर महागड्या किंवा वैशिष्ट्यपूर्ण पेनांचे शौकीन असतात. परीक्षेला जाणारा विद्यार्थी तर दोन पेन बरोबर ठेवतो. आतापर्यंत तुम्ही लिहिण्यासाठी पेन वापरला असेल पण तुम्ही कधी उत्तरं देणारा पेन पाहिलाय का ? हो तुम्ही अगदी बरोबर ऐकलंय, पुस्तक वाचून उत्तर देणारा पेन बाजारात आलाय.या स्मार्ट पेनची सध्या तरुणाईमध्ये जोरदार चर्चा सुरु आहे...ग्राहकांची या पेनला मोठी पसंती मिळतेय. या पेनचं वैशिष्ट्य काय आहे? पाहूयात

क्षणार्धात उत्तरं देणारा स्मार्ट पेन

स्मार्ट पेनचे नाव 'स्कॅनमार्कर पेन'

कोणताही प्रिंटेड मजकूर पेन स्कॅन करू शकतो

3000 अक्षरं प्रति मिनिटात स्कॅन करण्याची क्षमता

100 पेक्षा अधिक भाषांचे भाषांतर करण्यास सक्षम

ब्लूटूथ 4.0 सह वायरलेस किंवा USB-C द्वारे कनेक्ट

नोट्स, व्हॉइस मेमो रेकॉर्डिंग आणि MP3 स्वरूपात सेव्ह करणे शक्य

एकदा बॅटरी चार्जनंतर पेन 6 तास सुरु राहणार

स्मार्ट पेनची किंमत अंदाजे 26,400 रुपये

हा स्मार्ट रीडिंग पेन अनेकांसाठी उपयुक्त आहे. यामुळे विद्यार्थ्यांना, शिक्षकांना वाचन, नोट्स काढणे आणि भाषांतर करणे खूप सोपे होईल. तसेच माहिती डिजिटल स्वरूपात सहज मिळवता येईल. नवीन भाषा शिकणाऱ्यांसाठीही हा पेन फायदेशीर ठरेल. त्यामुळे तुमच्या खिशाला जर हा स्मार्ट पेन असेल तर तुमचा स्मार्टपणा आणखी वाढणार यात शंका नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : राज्यावर आर्थिक संकट, ८० लाख महिलांची नावे लाडकी बहीण योजनेतून वगळली, नेमकं सत्य काय?

Handvo Recipe: सकाळी नाश्त्यासाठी झटपट बनवा टेस्टी गुजराती हांडवो, वाचा सोपी रेसिपी

Maharashtra News Live Update: कांद्याला हमीभावासाठी मंचरमध्ये आज शेतकरी पुणे नाशिक महामार्ग रोखणार

गुजरात टायटन्स थोडक्यात बचावले, गिलसह संपूर्ण टीम बसमध्ये असताना आग

Fact Check: वैभव सूर्यवंशीला काव्याकडून घड्याळ गिफ्ट? पुढच्या वर्षी वैभव हैद्राबाद संघातून खेळणार?

SCROLL FOR NEXT