Maharashtra Politics : ठाकरे बंधूंच्या युतीच्या हालचालींना वेग, दोन बड्या नेत्यांमध्ये गुप्त भेट?

Maharashtra : ठाकरे आणि मनसे युतीच्या हालचालींना वेग आलाय. दोन्ही पक्षातील बड्या नेत्यांमध्ये गुप्त भेट झालीय. त्यामुळे युतीबाबत महिन्याभरात काय घडलं? पडद्याआडच्या हालचालींमधून युतीचा निर्णय कुठवर पोहचलाय? पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून...
uddhav thackeray raj thackeray
uddhav thackeray raj thackerayx
Published On

सुप्रिम म्हसकर, साम टीव्ही, प्रतिनिधी

हिंदीसक्तीविरोधात राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंनी एल्गार पुकारलाय. त्यामुळे ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चांना वेग आलाय. त्यात ठाकरे गटाचे आमदार वरुण सरदेसाई आणि मनसेचे ज्येष्ठ नेते बाळा नांदगावकर यांच्यात 2 ते 3 वेळा गुप्त भेटी झाल्याची चर्चा रंगलीय. मात्र बाळा नांदगावकर यांनी भेटीमागचं वेगळचं कारण सांगितलयं. दुसरीकडे मनसेचे मुंबई शहराध्यक्ष संदीप देशपांडे आणि वरुण सरदेसाई यांच्यातही तब्बल 4 वेळा भेट झाल्याची माहिती समोर आलीय. त्यामुळे भेटीगाठींतून दोन्ही पक्षांतील नेतृत्वामध्ये संपर्क असल्याचं स्पष्ट होतयं.

भेटीगाठींना वेग, युतीची चर्चा थेट?

- भेटीमागे महापालिका निवडणुकीचे मुख्य कारण

- पालिका निवडणुकीत दोन्ही पक्ष एकत्र येण्याची शक्यता

- युतीचे संभाव्य परिणाम महाराष्ट्राच्या राजकारणावर होणार

- भाजप आणि शिंदे गटाविरोधात मजबूत पर्याय उभा करण्याचा प्रयत्न

uddhav thackeray raj thackeray
Maharashtra : हिंदी भाषा जीआर रद्द ही आनंदाची वार्ता ठरली, पण मराठी माणसांच्या मनातील 'ती' इच्छा अपूर्ण राहिली

दरम्यान ठाकरे सेना आणि मनसेत युतीची चर्चा सुरु झाल्यानंतर महिनाभरात काय घडलं? पाहूयात...

- 4 जून 2025

आदित्य आणि अमित ठाकरेंकडून युतीला ग्रीन सिग्नल

- 6 जून 2025

'महाराष्ट्राच्या मनात तेच होईल' असं म्हणत उद्धव ठाकरेंकडून पुन्हा युतीचे संकेत

- 9 जून 2025

मविआकडूनही राज ठाकरेंसोबतच्या युतीला सकारात्मक प्रतिसाद

- 12 जून 2025

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतली राज ठाकरेंची भेट

- 19 जून 2025

शिवसेनेच्या वर्धापन दिनाला उद्धव ठाकरेंकडून पुन्हा युतीला सकारात्मक प्रतिसाद

- 21 जून 2025

युतीच्या भरवशावर न राहण्याचे उद्धव ठाकरेंचे आदेश

- 23 जून 2025

युतीच्या मुद्द्यावरून देशपांडे आणि राऊत यांच्या खडाजंगी

- 27 जून 2025

हिंदीसक्तीविरोधात ठाकरे बंधूंचा एकत्र मोर्चाचा इशारा

uddhav thackeray raj thackeray
Maharashtra Politics : ठाकरे बंधूंचा ५ जुलैचा मोर्चा होणार की नाही? संजय राऊत यांनी एका वाक्यात उत्तर देत विषय संपवला

दोन्ही पक्षांच्या नेत्यांमध्ये मागील महिनाभरात ‘बॅकडोअर’ डायलॉग सुरू आहेत. त्यात यावेळीही मनसेकडून 2017 प्रमाणे युती करण्याची सूत्रे बाळा नांदगावकर आणि संदीप देशपांडे यांच्या हाती आहेत. दोन्ही पक्षाच्या नेत्यांकडून भेटीगाठीनंतर थेट युतीचा प्रस्ताव कधी ठेवला जाणार? याकडे महाराष्ट्रचं लक्ष लागलयं.

uddhav thackeray raj thackeray
Raj Thackeray : ५ जुलैला विजयी सभा, उद्धव ठाकरेंची मोठी घोषणा; पण सभेला राज ठाकरे उपस्थित राहणार? 'या' दिवशी कोडं उलगडणार

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com