Car Stunt Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Car Stunt Viral Video: धावत्या कारमध्ये तरूणाईची जिवघेणी स्टंटबाजी; पुणे बंगळुरू हायवेवर नेमकं काय घडलं? Video

पुणे बंगळूर महामार्गावर तरुणांनी भरधाव गाडीतून धोकादायक स्टंटबाजी केली. व्हिडिओ व्हायरल झाला असून नागरिकांनी पोलिसांकडे कारवाईची मागणी केली आहे. अशा प्रकारचे स्टंट जीवघेणे ठरू शकतात.

Manasvi Choudhary

पुणे बंगळूरू राष्ट्रीय महामार्गावर चार चाकी वाहनातून स्टंटबाजी करतानाचा तरूणांचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. वाहनातून खिडकीच्या बाहेर डोकावून हे तरूण जीवघेणी स्टंटबाजी करताना दिसत आहे. याच दरम्यान एका वाहनचालकाने हा संपूर्ण थरार आपल्या मोबाईलच्या कॅमेऱ्यात चित्रित केला आहे जो सोशल मीडियावर लक्ष वेधून घेत आहे.

पुणे बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर वेळे ते पाचवड दरम्यान हा प्रकार घडला आहे. भरधाव वेगात सुरू असलेल्या चार चाकी वाहनामध्ये तरूणांची स्टंटबाजी सुरू आहे. तीन मुलासह एका मुलींचा यामध्ये समावेश आहे. व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, भरधाव वेगाने धावत असलेल्या या कारच्या छतावरील दरवाजा(सनरूफ) उघडून एक तरूण आणि तरूणी उभे आहेत तर वाहनाच्या दोन्ही बाजूच्या खिडक्यामधून बाहेर डोके काढून आणखी दोन तरूण उभे असल्याचं चित्र दिसत आहे. भर रस्त्यात या चौघांची ही स्टंटबाजी अत्यंत धोकादायक आहे.

अत्यंत धोकादायक पद्धतीने हे तरूण वाहन चालवत असल्याचं यामध्ये दिसत आहे. दरम्यान वेळीच अशा स्टंट करणाऱ्या तरूणांवर कारवाई करण्याची मागणी वाहनधारकांद्वारे केली जात आहे. अनेकदा सोशल मीडियावर स्टंटबाजीचे विविध व्हिडीओ पाहायला मिळतात. यामुळे आता वेळीच अश्या स्टंटबाजी करणाऱ्यांवर पोलिसांनी कारवाई केली पाहिजे यामुळे अन्य लोक करणार नाहीत.

वाहनातून स्टंटबाजी करणे अत्यंत धोकादायक

भर रस्त्यात चालत्या वाहनात उभे राहून स्टंटबाजी करणे अत्ंयत धोकादायक आहे. असे कृत्य केल्याने एखाद्याला जीवावर बेतू शकते. वेगाने धावत असलेल्या वाहनांमध्ये स्टंटबाजी करताना तोल गेला किंवा वाहनाने वळण घेतल्यास रस्त्यावर पडण्याची शक्यता असते यावेळेस गंभीर जखमी होऊन मृत्यू देखील होऊ शकतो यामुळे स्टंट करतानाचा वाहनाचा वेग आणि गती ही व्यक्तीच्या जीव देखील घेऊ शकते. यामुळेच कधीच स्टंटबाजी करू नये.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: जमीनमोजणीशिवाय दस्त नोंदणी नाही - चंद्रशेखर बावनकुळे

Asia Cup 2025: आज ओमानविरूद्ध मैदानात उतरणार सूर्या ब्रिगेड; बेंचवरील खेळाडूंना मिळणार संधी?

Ola Uber Fare Hike: ओला- उबरचा प्रवास महागला! भाड्यात मोठी वाढ, प्रवाशांच्या खिशाला फटका

Local Body Election: मोठी बातमी! स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा बार दिवाळीनंतर फुटणार, किती टप्प्यात होणार निवडणूक?

Diabetes Paitent: मधुमेह रूग्णांनी हे ५ पदार्थ कधीही खाऊ नयेत, रक्तातील साखर वाढते

SCROLL FOR NEXT