Viral Video: मध्यरा‍त्री मित्राला भेटायला आली, लोकांनी चोर समजून बेदम मारलं, नेपाळी मुलीचा व्हिडिओ व्हायरल

बरेलीत नेपाळी मुलीला चोर समजून बेदम मारहाण करण्यात आली. तिचा व्हिडिओ व्हायरल झाला असून, मुलगी गंभीर जखमी आहे. पोलिस तपास सुरू असून आरोपींचा शोध घेतला जात आहे.
Viral Video
Viral VideoSaam Tv
Published On

चोर समजून नेपाळी मुलीला बेदम मारतानाचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मुलगी जिवाच्या आकांताने मदतीसाठी विनवणी करत होती. 'मला वाचवा, पोलिसांना बोलवा' तिचे हे शब्द काळजाला धस्स करतात. उत्तर प्रदेशमधील बरेलीमध्ये ही घटना घडली आहे. गेल्या काही दिवसांपासून बरेलीमधील बारादरी परिसरात चोरीच्या घटना घडत आहेत. त्यामुळे रात्री काहीजण गस्त घालतात, त्यावेळी मध्यरात्री अडीच वाजता नेपाळी मुलगी त्यांना दिसली. त्यानंतर तिला जाब विचारला अन् बेदम मारहाण केली. त्यामध्ये ती गंभीर जखमी झाली आहे. तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

Viral Video
Viral Video: रामायणातील जटायू सापडला? कैलास पर्वतात जटायूची तपस्या?

या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून आरोपींचा शोध घेतला जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ही मुलगी उत्तर प्रदेशमध्ये कामासाठी आलेली होती. गेल्या काही दिवसांपासून ती कामाच्या शोधात होती, पण काम मिळत नव्हते. त्यात तिच्यासोबत भयंकर घटना घडल्याने सोशल मीडियावर हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. स्थानिक मिडिया रिपोर्ट्सनुसार, बरेलीमधील त्या नराधमांनी नेपाळी मुलीला बेदम मारहाण केली. पण तिचे कपडे फाडत माणुसकीला काळिमा फासला.

Viral Video
Viral Video : सरकारी रूग्णालयात उंदरांचा सुळसुळाट, रूग्णाच्या अंगावर उंदीर फिरतानाचा व्हिडीओ समोर

नेपाळमधून कामानिमित्त उत्तर प्रदेशमध्ये आलेल्या मुलीला चोर समजून नागरिकांनी मारहाण केल्याचा हा धक्कादायक प्रकार व्हायरल होत आहे. 'मला वाचवा, पोलिसांना बोलवा' असं म्हणत असतानाचा तिच्या व्हिडिओने उत्तर प्रदेशमध्ये खळबळ उडाली आहे. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, नेपाळी मुलीला बेदम मारत असल्याचे दिसत आहे. आजूबाजूला संपूर्ण नागरिकांचा जमाव दिसत आहे. ती मुलगी बघ्यांकडे मला वाचवा, पोलिसांना बोलवा अशी अर्त हाक मारत आहे. पण तिच्या मदतीला कुणी आलेले दिसत नाही. नेपाळी मुलीला मारणाऱ्या टोळक्यांच्या हातात काट्या, बांबू दिसत आहेत. 'तू चोर आहे' तुला आता सोडणार नाही, तुझे हात- पाय तोडणार असं म्हणत नेपाळी मुलीला बेदम मारत असल्याचे व्हिडिओत दिसत आहे.

Viral Video
Viral Video : धावत्या स्कुटीवर विजेचा खांब पडता पडता राहिला, महिला थोडक्यात बचावली, घटना CCTV मध्ये कैद

मिळालेल्या माहितीनुसार, टोळक्याला नेपाळी मुलगी हात जोडून मी चोर नाही, हे सांगत होती. पण त्या टोळक्यातील नराधमावर कोणताही परिणाम होत नव्हता. ते तिला काठी अन् लाथा-बुक्क्यांनी मारतच होते. मुलीने तिथून पळ काढण्याचा प्रयत्न केला. पण जमावाच्या ताकदीपुढे ती हतबल झाली. नरधमांनी नेपाळी मुलीला विजेच्या पोलला बांधूनही मारहाण केल्याचे स्थानिक रिपोर्ट्समधून समोर आलेय. हा सगळा प्रकार घडत असताना एका सुजान नागरिकाने पोलिसांना सांगितले. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत मुलीची सुटका केली. तिला तात्काळ उपचारासाठी जवळच्या रूग्णालयात दाखल केले. नेपाळी मुलगी गंभीर जखमी झाली असून तिच्यावर उपचार सुरू आहेत. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून तपास सुरू आहे. मारहाण करणाऱ्या आणि व्हिडिओ व्हायरल कऱणाऱ्या आरोपींचा शोध घेतला जात आहे.

नेपाळी मुलगी तिथे का गेली ?

हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी तात्काळ तपासाला सुरूवात केली. मुलगी त्या परिसरात का गेली? याचाही शोध पोलिसांनी घेतला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नेपाळी मुलगी त्या ठिकाणी राहणाऱ्या नातेवाईकांना भेटण्यासाठी गेली होती. नेपाळी मुलीला तिथे राहणाऱ्या मित्राने बोलवलं होतं, ती भेटण्यासाठी गेली असता नागरिकांना चोर असल्याचा संशय आला. विचारपूस न करता त्यांनी बेदम मारहाण केली. याप्रकरणी तपास केला जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com