Viral Video: रामायणातील जटायू सापडला? कैलास पर्वतात जटायूची तपस्या?

Reality Check: तुम्ही जटायू पक्षी पाहिलाय का...? रामायणातील जटायू पक्षी दिसलाय...होय, एक व्हिडिओ व्हायरल होतोय...त्या व्हिडिओतील पक्षी जटायू असल्याचा दावा करण्यात आलाय...पण, खरंच जटायू पक्षी भारतात आहे का...? याची आम्ही पडताळणी केली
The giant bird seen in the viral video is not Jatayu from the Ramayan, but an Andean Condor found in the Andes Mountains of South America.
The giant bird seen in the viral video is not Jatayu from the Ramayan, but an Andean Condor found in the Andes Mountains of South America.Saam Tv
Published On

हा व्हिडिओ पाहा...या व्हिडिओत भलामोठा पक्षी दिसतोय...व्हिडिओ पाहून हा पक्षी जटायू असल्याचा दावा करण्यात आलाय...रामायणातील जटायू सदृश्य पक्षी असल्याचा दावा केल्याने सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसलाय...पण, खरंच हा जटायू आहे का...?

रामायण तुम्ही पाहिलं असेल तर हा पक्षी तुमच्या लगेलच लक्षात येईल...आता हा व्हिडिओ व्हायरल झाल्याने हा पक्षी जटायूच असल्याचा दावा केलाय...पण, खरंच हा पक्षी जटायू आहे का...? कारण, हा प्रश्न लोकांच्या श्रद्धेचा आहे...बरेच लोक हा व्हिडिओ कुठला आहे असं विचारतायत...काहींना हा पक्षी प्रत्यक्षात जाऊन पाहायचाय...त्यामुळे आमच्या व्हायरल सत्य टीमने याची सत्यता जाणून घेण्याचा प्रयत्न केला...हा व्हिडिओ कुठला आहे तेही शोधण्याचा आम्ही प्रयत्न केला...याबाबत अधिक माहिती प्राणी प्रेमींकडून मिळू शकते...त्यामुळे प्राणीप्रेमींकडून अधिक माहिती जाणून घेतली...

व्हायरल व्हिडिओतील पक्षी जटायू नाही

अँडियन कॉन्डोर असं या पक्षाचं नाव

अर्जेंटिना,द.अमेरिकेतील अँडीज पर्वतात आढळतो

...हा व्हिडिओ जटायूच्या नावाने व्हायरल झालाय...मात्र, हा व्हिडिओ दक्षिण अमेरिकेतील अँडीज पर्वतांतील असल्याची माहिती मिळतेय...त्यामुळे आमच्या पडताळणीत रामायणातील जटायू सापडल्याचा दावा असत्य ठरलाय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com