Viral video woman placing baby inside scooter dicky saam tv
व्हायरल न्यूज

Viral Video: धक्कादायक! बाळाला डिक्कीत ठेवून स्कूटी चालवली; महिलेच्या व्हायरल व्हिडिओवर नेटकऱ्यांचा संताप

Viral video woman placing baby inside scooter dicky: सोशल मीडियावर एक धक्कादायक व्हिडिओ व्हायरल झाला आहे ज्यामध्ये एक महिला स्कूटीच्या डिक्कीत बाळ ठेवून प्रवास करताना दिसते.

Surabhi Jayashree Jagdish

सोशल मीडियावर सध्या एक धक्कादायक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना दिसतोय. या व्हिडिओमध्ये एका महिलेने स्कूटीच्या डिक्कीमध्ये एका लहान बाळ ठेवून प्रवास केल्याचं दिसून येतंय. काही सेकंदांचा हा व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल झाला असून त्यावर हजारो प्रतिक्रिया उमटत आहेत.

काय घडलंय या व्हिडीओमध्ये?

या व्हिडीओमध्ये एक महिला स्कूटी चालवत असल्याचं दिसतंय. त्यापूर्वी तिच्या हातात एक बाळ आहे. ती स्कुटीची सीट उघडून स्कूटीच्या डिक्कीत त्या बाळाला ठेवते. त्या डिक्कीमध्ये बाळाच्या डोक्याखाली असलेली उशी आधीच ठेवलेली आहे. ती बाळाला त्या उशीवर ठेवतो आणि सीट बंद करते. त्यानंतर ती स्कुटी चालवू लागते.

हा व्हिडिओ पाहून सोशल मीडियावर व्हायरल झाला असून त्यावर विविध प्रतिक्रिया उमटताना दिसतायत. अनेकांनी या घटनेवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. काही युजर्सने शूट करणाऱ्या व्यक्तीला देखील सुनावलं आहे.

लोकांनी कमेंटमध्ये व्यक्त केली नाराजी

यावेळी अनेकांनी कमेंटमध्ये संताप व्यक्त केलाय. एका युजरने म्हटलंय की, “बाळाच्या सुरक्षेशी असा खेळ करणं धोकादायक आहे. तर काहींनी प्रशासनाने या प्रकरणाची चौकशी करावी आणि अशा प्रकारांवर कारवाई करावी, अशी मागणीही केलीये.

दरम्यान हा व्हिडीओ मध्ये कट करण्यात आल्याचं दिसून येतंय. सध्या या व्हिडिओची सत्यता आणि तो नेमका कुठे शूट करण्यात आला, याबाबत अधिकृत माहिती समोर आलेली नाही. मात्र या घटनेने सोशल मीडियावर मोठी चर्चा निर्माण केली असून केवळ रील्सना व्ह्यूज मिळवण्यासाठी असं करणंही धोकादायक असल्याचं म्हटलं जातंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

देशात कागदी चलनाचे दिवस संपणार? RBI प्लास्टिकच्या नोटा चलनात आणणार?

Thane Water Cut: ठाणेकरांसाठी महत्वाची बातमी, ३ जून रोजी पाणीपुरवठा राहणार बंद, कोणकोणत्या भागांना बसणार फटका?

Deepali Sayyad: 'कितीही धमक्या येऊ द्या....'; भोंदू अशोक खरातवरील चित्रपटाबाबत अभिनेत्री दीपाली सय्यदची ठाम भूमिका

Maharashtra News Live Update: नीट पेपरफुटी प्रकरणी सर्वात मोठी अपडेट, मनीषा हवलदार आणि तेजस शहा यांच्या मधला दुवा सापडला?

राज्यात घराणेशाहीची दुसरी इनिंग, मुलांच्या आमदारकीसाठी नेत्यांचं लॉबिंग, नेत्यांच्या मुलांसाठी निष्ठावंतांना डावलणार?

SCROLL FOR NEXT