Shocking Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Shocking Video: अति घाई संकटात नेई! दोन बस समोरासमोर धडकल्या, भीषण घटनेचा व्हिडिओ

Viral Video: सोशल मीडियावर सध्या कन्नूरच्या कलेरीरममला येथे घडलेल्या अपघाताचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. नक्की संपूर्ण अपघात कसा घडला ते पाहा.

Tanvi Pol

Bus Accident: सोशल मीडियावर सध्या केरळमधील कन्नूरमध्ये घडलेल्या अपघाताचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. जिथे दोन बसची समोरासमोर धडक झालेली आहे. घडलेल्या भीषण अपघातात तब्बल ३४ प्रवासी जखमी झाले असल्याचे समजते. मात्र या अपघाताचे मुख्य कारण काय आणि अपघात कसा घडला ते तुम्ही खाली पाहा.

नेमका अपघात कसा घडला?

व्हायरल(Viral) होत असलेल्या व्हिडिओत एक पदरी रस्ता दिसून येत आहे. या रस्तावर सुरुवातीस वाहनांची कोणतीच ये-जा नाही मात्र काही वेळात या एकपदरी रस्त्यावर दोन्ही दिशेने वेगात बस येतात आणि पाहताच काही क्षणात दोन्ही बस एकमेंकाना वेगात धडकल्या जातात. व्हिडिओत तुम्ही पाहू शकता, अपघातानंतर बसची अवस्था कशी झालेली आहे. बसच्या अपघात होताच बसमधील अनेक नागरिक ताबडतोड रस्त्यावर येतात. संपूर्ण घटना रस्त्यावर असलेल्या सीसीटीव्हीत(Cctv) कैद झालेली आहे.

संपूर्ण अपघाताच्या घटनेचा व्हिडिओ एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हायरल होत असून तो व्हिडिओ एक्सवरील @ians_india या पेजवर पोस्ट करण्यात आलेला आहे. व्हिडिओ पोस्ट केल्यानंतर कॅप्शनमध्ये,''कन्नूर, केरळ येथील कन्नूरच्या कलेरीरममला येथे दुपारी ३ वाजता दोन KSRTC बसची टक्कर झाली, यात ३४ प्रवासी जखमी झाले. मुसळधार पाऊस आणि खराब दृश्यमानता कारणीभूत असल्याचे मानले जाते'' असे लिहिले आहे.

व्हिडिओ पाहताच प्रत्येक नागरिकांच्या काळजाचा ठोका चुकला आहे शिवाय व्हिडिओ पाहिल्यानंतर अनेक प्रतिक्रियाही आलेल्या आहेत.त्यातील एका यूजरने लिहिले आहे की,'' वेगावर कायम नियंत्रण आवश्यक'' तर अनेक यूजर्संनी लिहिले आहे की,'' एवढा वेग गरजच नव्हती'' तर तिसऱ्या एका यूजरने लिहिले आहे की,'' खूपच थरारक अपघात होता'', अशा अनेक प्रतिक्रिया आलेल्या आहेत.

टीप : हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bhiwandi Accident: देवदर्शनावरून घरी परतताना काळाचा घाला; मुंबई-नाशिक महामार्गावर दुचाकीचा अपघात, बापलेकीचा मृत्यू

Leopard Attack: मैत्रीला जागला...! बिबट्याचा कुत्र्यावर हल्ला, श्वानाच्या निडर मैत्रीसमोर बिबट्याची माघार Video Viral

IPS Anjana Krishna: आधी वाद नंतर अजितदादांची स्पष्टीकरणाची पोस्ट; उपमुख्यमंत्र्यांनाच पॉवर दाखवणारी अंजली कृष्णा नेमक्या कोण?

Vanraj Andekar Case: तोच महिना अन् आंदेकर टोळीने नाना पेठेतच आयुषचा गेम केला, पुण्यात रक्तरंजित थरार

HIV: एचआयव्हीच्या रुग्णांनी कोणत्या गोष्टी केल्या पाहिजेत?

SCROLL FOR NEXT