Shocking Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Shocking Video: दोन बैलांमधील झुंजीदरम्यान ८५ वर्षीय वृद्धाचा मृत्यू, संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद

Rajasthan Viral Video: सोशल मीडियावर सध्या एका थरारक घटनेचा सीसीटीव्ही व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्या व्हिडिओमध्ये एका वृद्द व्यक्तीचा मृत्यू किती भयंकर होतो ते दिसत आहे. तुम्हीही एकदा व्हिडिओ पाहा.

Tanvi Pol

राजस्थानमधील एका गावात झालेल्या दुर्दैवी घटनेने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. बैलांच्या झुंजीदरम्यान ८५ वर्षीय वृद्धाचा दुर्दैवी मृत्यू झाला असून ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे आणि नागरिकांमध्ये संतापाची भावना निर्माण झाली आहे.

दुर्दैव म्हणजे, ही संपूर्ण घटना तिथल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालेली आहे. व्हायरल व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसते की, वृद्ध बैलांच्या झुंजीपासून थोड्या अंतरावर शांतपणे उभे होते. मात्र, झुंजेतील एक बैल अचानक बाजूला वळला आणि वृद्धांवर धाव घेतली. स्थानिक नागरिकांनी तात्काळ धाव घेतली आणि वृद्धाला रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

संपूर्ण घटना सध्या वाऱ्याच्या वेगाने सोशल मीडियावर पाहिली गेली असून एक्स,फेसबूक अशा प्लॅटफॉर्मवर व्हिडिओ जास्त संख्येनी पाहिला जात आहे आणि तो व्हिडिओ आता इन्स्टाग्रामवरील abpnewstv या अकाउंटवर अपलोड करण्यात आलेला आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये नेमकी घटना कुठली आहे ते सांगितले आहे.

व्हिडिओ पाहून प्रत्येकजण हैराण झालेला आहे तर अनेक प्रतिक्रिया देखील दिलेल्या आहेत. त्यातील एका यूजरने कमेंट केली,''कधीही काही होऊ शकते'' तर दुसऱ्या यूजरने म्हटलं की,''त्याची काही चुक नव्हती'' शिवाय अशा प्रकारे अनेकांनी भावनिक प्रतिक्रिया दिलेल्या आहेत.

टीप : हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Asia Cup 2025 Final: भारत आणि पाकिस्तानमध्ये फायनल,आशिया कप स्पर्धेत कोण बाजी मारणार?

Kendra Trikona Rajyog: 30 वर्षांनंतर शनीने बनवला पॉवरफुल योग; 'या' राशींना मिळणार पैसाच पैसा

Todays Horoscope: 'या' राशीच्या व्यक्तींनी मनाचा कौल घेऊन पुढे जावं; वाचा राशीभविष्य

Hans Mahapurush Rajyog: 100 वर्षांनी दिवाळीला गुरु बनवणार हंस राजयोग; 'या' राशींना बिझनेसमधून मिळणार नफा

PAK vs BAN: बांगलादेश आऊट; फायनलमध्ये रंगणार भारत-पाकिस्तान सामन्याचा थरार

SCROLL FOR NEXT