सोशल मीडियावर सध्या एका बैलाचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये रस्त्याच्या मध्यभागी उभा असलेला एक बैल समोरून येणाऱ्या ट्रॅक्टरवर अचानक हल्ला करताना दिसतो. हा व्हिडीओ पाहून तुमच्याही काळजाचा ठोका चुकेल. अवघ्या काही वेळात हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
व्हायरल व्हिडीओमध्ये एक मोठा बैल रस्त्याच्या मधोमध उभा असल्याचं दिसतंय. काही क्षणांतच तिथून एक ट्रॅक्टर पुढे येताना दिसतो. मात्र बैलाला पाहून ट्रॅक्टर चालक जागीच थांबतो. पण अचानक बैल आक्रमक होऊन शिंगांनी ट्रॅक्टरच्या पुढील भागावर जोरदार धडक देतो. या धडकेमुळे ट्रॅक्टरचा समोरील भाग तुटल्याचंही व्हिडीओमध्ये पाहायला मिळतोय.
घटनेदरम्यान ट्रॅक्टर चालकाने प्रसंगावधान राखत लगेच उडी मारून स्वतःचा जीव वाचवला. बैल इतका संतापला होता की, चालक खाली उतरल्यावरही तो काही वेळ ट्रॅक्टरवर हल्ला करत राहिला.
हा व्हिडिओ इंस्टाग्रामवर @aura.decoded या अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. काही वेळातच या व्हिडीओला हजारो व्हिव्ज मिळालेत. शिवाय अनेकांनी व्हिडीओवर कमेंटही केल्या आहेत. काही युजर्सनी, किती भितीदायक घटना आहे, असं म्हटलंय. तर काहींनी चालकाचं नशीब चांगलं असल्याचं म्हटलंय.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.