Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Viral Video: भयंकर! अख्खा ब्रिज क्षणात कोसळला, ट्रक धपकन पडला, बाईकवाल्याचा जीव थोडक्यात वाचला, धडकी भरवणारा व्हिडीओ

Shocking Viral Video: सोशल मीडियावर सध्या एका धक्कादायक अपघाताचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. जो सध्या मोठ्या प्रमाणात चर्चेत आलेला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

महाराष्ट्राच नाही तर जगभरातील अनेक ठिकाणी मुसळधार पावसाने धुमाकूळ घातलेला आहे. कुठे संपूर्ण गाव पाण्याखाली गेलेले आहेत तर कुठे आलेल्या पुराच्या पाण्यामुळे मोठ्या प्रमाणात जीवितहानी तर कुठे वित्तहानी झालेली आहे. या संपूर्ण घटनेचे काही व्हिडिओज आपल्याला सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे. अशातच एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक धक्कादायक अपघाताचा व्हिडिओ व्हायरल झालेला आहे. जो की सर्वत्र व्हायरल होत आहे.

व्हायरल होत असलेला व्हिडिओ व्हिएतनामधील आहे. जिथे अनेक दिवसांपासून मुसळधार पाऊस (Rain) सुरु आहे. मात्र गेल्या शनिवारी व्हिएतनामध्ये चक्रीवादळामुळे पाऊस पडत होता. अशा वातावरणात अनेक व्यक्तींचा प्रवास सुरु होता. असाच प्रवास करत असताना अचानक ब्रिज कोसळल्याची घटना घडलेली आहे. मात्र यात ब्रिज कोसळताना त्याच्या सोबत मोठा ट्रक ब्रिजसह खाली कोसळला आहे. सर्व धक्कादायक (Shocking) प्रसंगाचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे.

व्हायरल होत असलेला व्हिडिओ (Video) सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवरील ''@AJEnglish'' या अकाउंटवर शेअर करण्यात आलेला आहे. व्हिडिओ पाहताच मोठ्या प्रमाणात व्हिडिओला व्ह्यूज मिळाले आहे तर अनेक सोशस प्लॅटफॉर्मवर (Platform) शेअर करण्यात आलेला आहे. व्हिडिओ पाहिल्यानंतर अनेक यूजर्संनी आश्चर्यकारक अशा प्रतिक्रिया केलेल्या आहेत.

व्हायरल (Viral) असलेल्या व्हिडिओत तुम्हाला साधारण एक रस्ता दिसून येत आहे. व्हिडिओ तुम्हाला पुढे एक लांब लचक असा ब्रिज दिसून येत आहे. या ब्रिजवरुन अनेक वाहने जात आहेत. मात्र तुम्हाला व्हिडिओत सुरुवातीस एक ट्रक दिसून येत आहे. जो की ब्रिजच्या दिशेने जात आहे मात्र काही ट्रक जसा ब्रिजवर जातो, तसा ब्रिज कोसळतो आणि ब्रिज कोसळल्याने ट्रकही संपूर्ण खाली पडतो. मात्र ट्रकच्या पाठी मागून जाणारा बाइकस्वार थोडक्यात बचावला जातो. संपूर्ण घटना ट्रकच्या पाठी असलेल्या एका प्रवाशाच्या मोबाईमध्ये कैद झालेला आहे.

टीप : हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Lucky Mobile Number : मोबाईल नंबर तुम्हाला बनवेल लखपती? जाणून घ्या शेवटच्या Lucky अंकाचा खेळ

Maharashtra News Live Update: अल निनोमुळे राज्यात पाणी टंचाईची भीषण समस्या

Mumbai Toll: मुंबईकरांचा प्रवास महागला, टोलच्या दरात मोठी वाढ; नवे दर किती?

Walking Benefits: १० मिनिटं की ६० मिनिटं; दररोज किती चाललं पाहिजे? तुमच्या आरोग्यासाठी दोघांपैकी काय ठरेल फायदेशीर?

Accident News : भाजपच्या बड्या नेत्याच्या कारचा भीषण अपघात! भरधाव ट्रेलरने दिली जोरदार धडक

SCROLL FOR NEXT