Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Viral Video: रिल्ससाठी मुलाच्या जीवाशी खेळ! चिमुकल्याला थेट टेरेसच्या भिंतीवर बसवले! VIDEOपाहून नेटकरी संतापले

Social Media Stunt: सोशल मीडियावर एका आई आणि तिच्या चिमुकल्याचा धक्कादायक व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे.व्हिडिओ पाहिल्यानंतर जे काही तुम्ही पाहाला त्यानंतर नक्कीच संताप व्यक्त कराल.

Tanvi Pol

Dangerous Video Internet: प्रत्येक आईसाठी तिचं मुलं सर्वात खास असते.मग आई आपल्या मुलाच्या सुरक्षितेपासून त्याच अख्ख आयुष्य चांगल करण्यासाठी धडपड करत असते.मात्र सध्या व्हायरल होत असलेला व्हिडिओ एका आईचा आणि चिमुकल्याचा आहे,परंतू एका रिल्स व्हिडिओसाठी चिमुकल्याचा जीव धोक्यात घातला आहे.जो व्हिडिओ पाहून प्रत्येक नेटकरी वर्गाचा संताप अनावर झालेला आहे.

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत तुम्हाला एक उंच इमारत दिसत आहे आणि याच इमारतीच्या टेरेसवर एक महिला तिच्या अगदी गोड चिमुकल्याला घेऊन आहे.जर तुम्ही व्हिडिओत नीट पाहिले तर महिलेने तिच्या गोड चिमुकल्याला टेरेसच्या अगदी टोकावरील जागेवर बसवलेले आहे आणि दुसऱ्या हातात मोबाईल घेऊन रिल्स(Reels) बनवत आहे.एका हाताने चिमुकल्याला पकडले आहे जर अगदी जराही चिमुकल्याने जोरदार हालचाल केली असती तर अतिशय दु:खत घटना घडली असती.

रील्स व्हिडिओ सध्या इन्स्टाग्राम या सोशल मीडिया अकाउंटवर पाहता येत आहे,त्यात तो इन्स्टाच्या varsha._.yaduvanshi_tanwar या अकाउंटवर अपलोड करण्यात आलेला आहे.व्हिडिओ नक्की कुठल्या शहरातील आहे हे समजले नाही मात्र गेल्या काही महिन्यांपासून जोरदार व्हायरल होत असून नेटकऱ्यांच्या मोठ्या प्रमाणात चर्चेचा विषय ठरला आहे.

नेटकऱ्यांचा संताप अनावर!

महिलेचा हा रिल्स व्हिडिओ (Video)पाहिल्यानंतर प्रत्येकजण हैराण झालेले आहे,मात्र व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये विविध प्रतिक्रियाही केलेल्या आहेत.त्यातील एका यूजरने कमेंट केली आहे,''रीलमुळे तुम्ही मुलांचे जीव का धोक्यात घालत आहात?'' तर दुसऱ्या एका यूजरने कमेंट केली आहे,''पोलिसांनी कडक कारवाई करावी'' तर काहींनी त्या महिलेला सुनावले आहे तर काहींनी कारवाई करण्याची मागणी कमेंटद्वारे केलेली आहे.

टीप : हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: मुसळधार पावसाचा फटका; मुंबई-अहमदाबाद महामार्गाच्या सर्विस रोडवर दरड कोसळली

Dark Chocolate Benefits: हृदयापासून मेंदूपर्यंत आरोग्याला मिळतात अनेक लाभ; डार्क चॉकलेट खाण्याचे ७ जबरदस्त फायदे

पावसाळ्यात बनवा चटपटीत टोमॅटो चीज चटणी पकोडा; एकदा खाल्लं की खातच राहाल|Tomato Cheese Chutney Pakoda

Chanakya Niti: राग संपवू नका, त्यावर नियंत्रण ठेवा; चाणक्यांनी यश मिळवण्यासाठी दिला मोलाचा सल्ला

Paneer Puff Recipe: घरच्या घरी बनवा खुसखुशीत पनीर पफ; चहासोबत लागेल भन्नाट चव

SCROLL FOR NEXT