Viral Video: रिल्स बनवण्यासाठी चालत्या कारवर मद्यपी तरुणाची स्टंटबाजी, व्हिडिओ व्हायरल

Young Man Seating on Car Roof viral video : नाशिकमध्ये रिल्स बनवण्यासाठी चालत्या कार वर बसून तरुणाच्या स्टंटबाजीचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी कारवाई केलीय.
 Viral Video  man stunt
Viral Video man stuntSaam Tv
Published On

सोशल मीडियावर लोकप्रिय होण्यासाठी अनेकजण वेगवेगळ्या आयडिया लढवत व्हिडिओ पोस्ट करत असतात. तर काही जीवघेणा स्टंट करत असतात, असाच एक सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. रील बनवण्यासाठी मद्यधुंद तरुण कारच्या टपावर बसून व्हिडिओ बनवत आहे. हा व्हिडिओ नाशिक-पुणे महामार्गावरील असल्याचं सांगितलं जात आहे.

सध्या सोशल मीडियावर लोकप्रिय होण्यासाठी आणि लाईक्स मिळवण्यासाठी बहुतेकजण रील बनवत असतात. तर काही स्टंट करत असतात. अशा स्टंट करताना अनेकांनी जीवाशी येत असतं. परंतु सोशल मीडियावर लोकप्रिय होण्याचं क्रेझ जास्त असल्याने धोका असतानाही बहुतेक जण स्टंट करतात. अशाच एक व्हिडिओ नाशिकमधून व्हायरल होत आहे. एक मद्यधुंद तरुण कारच्या टपावर बसून व्हिडिओ काढत आहे.

व्हिडिओमध्ये आपण पाहू शकतो की, एक कार धावताना दिसत आहे, त्या कारच्या टपावर काळ्या रंगाचा शर्ट घातलेला एक तरुण बसलेला दिसत आहे. हवेत हात वारे करत आहे. चालत्या गाडीच्या टपावर अत्यंत धोकादायक पद्धतीने आणि जीव धोक्यात घालून मद्यपी तरुणाची स्टंटबाजी करत होता. तरुणाच्या स्टंटबाजीचा व्हिडिओ त्याच्या मित्राने शेअर केलाय. तरुणाच्या स्टंटबाजीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर उपनगर पोलिसांनी कारवाई केली आहे. स्टंटबाजी करणाऱ्या तरुणाच्या मुसक्या आवळत पोलिसांनी तरुणाला ताब्यात घेतलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com