Saam Tv
व्हायरल न्यूज

व्हायरल होण्यासाठी जीवाशी खेळ; रील्ससाठी धावत्या ट्रेनखाली झोपली तरुणी; VIDEO

Dangerous Stunt Video: व्हायरल होण्यासाठी धोकादायक पाऊल. एका तरुणीने धावत्या ट्रेनखाली झोपून रील बनवली. सोशल मीडियावर व्हिडिओ प्रचंड व्हायरल; पोलीस आणि कुटुंबीयांनी व्यक्त केला तीव्र संताप.

Tanvi Pol

Shocking Stunt Video: सध्या सोशल मीडियावर प्रसिद्ध होण्याची हौस काहींच्या डोक्यात इतकी भरली आहे की, ती हौस त्यांच्या जीवावर बेतू लागली आहे. अशाच एका धक्कादायक प्रकाराने पुन्हा एकदा सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर वादळ निर्माण केलं आहे. एक तरुणी केवळ रील्स बनवण्यासाठी धावत्या ट्रेनखाली झोपल्याचा थरारक प्रकार समोर आला आहे.

जीवघेणा स्टंट,फक्त रीलसाठी!

ही धक्कादायक(Shocking) घटना नेमकी कुठली आहे ते अद्याप समजू शकले नाही. एका रेल्वे ट्रॅकवर धावणाऱ्या ट्रेनखाली झोपून रील्स तयार करण्याचा थरारक प्रकार एका तरुणीने केला. तिचा हा व्हिडीओ काही तासांतच सोशल मीडियावर व्हायरल झाला. बघता-बघता हजारो लाईक्स, शेअर आणि कमेंट्स येऊ लागल्या.

व्हिडिओत दिसतो थरकाप उडवणारा क्षण

व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये ही तरुणी रेल्वे रुळांवर झोपलेली दिसते आणि एका बाजूने ट्रेन मोठ्या वेगात तिच्या अगदी जवळून जाते. तिचा चेहरा कॅमेऱ्यात पूर्ण स्पष्ट दिसतो. ट्रेन तिच्या अगदी डोक्याच्या काही इंचांवरून जात असल्याने तो प्रसंग पाहून प्रेक्षकांचा थरकाप उडतो.

सोशल मीडियावर संमिश्र प्रतिक्रिया

या घटनेनंतर सोशल मीडियावर यावर संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या. काही जणांनी तिला खूप निंदा केली तर काहींनी केवळ प्रसिद्धीसाठी जीव धोक्यात घालणं चुकीचं असल्याचं सांगितलं. काहींनी तर हा व्हिडिओ(Video) तात्काळ हटवण्याची मागणी केली.

टीप: हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana: सरकारी लाडकीला दणका, 15 कोटी वसूल करणार

Belly Fat: पोटाची चरबी वाढलीये? फॉलो करा 'या' सोप्या टिप्स, पोटाचा घेर होईल कमी

Akola News: बापरे! महिला 50% होरपळली; एकनाथ शिंदेंचा थेट पोलीस अधीक्षक आणि माजी आमदारांना फोन; नेमकं काय आहे प्रकरण?

शेतकरी पाण्यात, जिल्हाधिकारी मग्न नाचगाण्यात, जिल्हाधिकाऱ्याचा प्रताप, नागरिकांचा संताप

Damage Lungs: खराब फुफ्फुसांचे आरोग्य सुधारण्यासाठी खा 'हे' पदार्थ, ठरतील गुणकारी

SCROLL FOR NEXT