Paragliders mid air collision SAAM TV
व्हायरल न्यूज

Viral Video: आकाशात ३ हजार फुटावर घडली दुर्घटना, 2 पॅराग्लायडर एकमेकांवर आदळले; व्हिडिओ पाहून अंगावर येईल काटा, VIDEO

Paragliders mid air collision: ३००० फूट उंचीवर दोन पॅराग्लायडर हवेत एकमेकांवर आदळल्याचा धक्कादायक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

Surabhi Jayashree Jagdish

सोशल मीडियावर दररोज अ‍ॅडव्हेंचरशी संबंधित अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. काही व्हिडिओ रोमांचक असतात तर काही अंगावर काटा आणणारेही ठरतात. सध्या असाच एक धक्कादायक व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होताना दिसतोय. या व्हिडिओमध्ये जमिनीपासून सुमारे 3000 फूट उंचीवर हवेत उडणारे दोन पॅराग्लायडर अचानक एकमेकांवर आदळताना दिसतायत.

हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर @iNikhilsaini या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओमध्ये दोन पॅराग्लायडर आकाशात उडत आहेत. यावेळी दोघंही उंचावर हवेत तरंगत असताना अचानक दिशा बदलताना ते एकमेकांवर आदळतात.

या दोघांनी एकमेकांना दिलेली ही धडक इतकी जोरदार असते की दोन्ही पॅराशूट एकमेकांत गुंतून जातात. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून लोकांनी याबाबत चिंता व्यक्त केलीये.

सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल

मात्र काही सेकंदांतच दोन्ही पॅराग्लायडर आपापले रिझर्व पॅराशूट उघडतात. त्यामुळे मोठा अपघात टळतो आणि दोघांचेही प्राण वाचतात. जरी हा प्रसंग काही सेकंदांचा असला तरी त्या काही क्षणांमध्ये निर्माण झालेली परिस्थिती पाहून अनेकांच्या अंगावर काटा येतो.

सोशल मीडियावर लोकांच्या प्रतिक्रिया

हा व्हिडिओ समोर आल्यानंतर सोशल मीडियावर अ‍ॅडव्हेंचर स्पोर्ट्सच्या सुरक्षेबाबत प्रश्न उपस्थित केले जातायत. अनेक युजर्सने अशा प्रकारच्या अ‍ॅडव्हेंचर अ‍ॅक्टिव्हिटींमध्ये सुरक्षेच्या नियमांचं पालन केलं जातेंका, असा सवाल उपस्थित केला आहे.

एका युजरने कमेंट करत लिहिलंय, 'लोक अशा अ‍ॅडव्हेंचर अ‍ॅक्टिव्हिटीसाठी पैसे का देतात? मोठा अपघात होईपर्यंत सुरक्षा आणि देखरेख गांभीर्याने घेतली जात नाही.' दुसऱ्या एका युजरने म्हटलंय की, 'नशीब चांगलं होतं म्हणून रिझर्व पॅराशूट उघडलं.'

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

PM Care Fund मध्ये बॅलन्स किती?सरकारकडून आकडेवारी सार्वजनिक

श्रावण स्पेशल मालवणी स्टाईल खुसखुशीत अळूवडी; सोपी रेसिपी आजच करून पाहा!

Maharashtra News Live Update: नवनाथ वाघमारे यांच्यावर गुन्हा दाखल करा; मराठा क्रांती मोर्चाची मागणी

Social media workouts: सोशल मीडियावरचे हे फिटनेस ट्रेंड फॉलो करताय? ही चूक करू नका, मणक्याला होऊ शकते गंभीर इजा

Maharashtra Freedom of Religion Act : धर्म स्वातंत्र्य कायदा रक्षाबंधनापासून लागू, राजपत्रात अधिसूचना प्रसिद्ध

SCROLL FOR NEXT