Viral Video saam digital
व्हायरल न्यूज

Viral Video: समुद्रात फोटोशूट करणं बेतलं जीवावर; लाट आली अन् तरुणीला क्षणात घेऊन गेली, थरारक VIDEO

Shocking Video: सोशल मीडियावर एका तरुणीचा समुद्रातील व्हिडिओ व्हायरल होत आहे,ज्यात महिलेचा अतिउत्साह तिला कशा प्रकारे नडला आहे ते समजते.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Young Woman Shocking Video

सध्याच्या काळात लहानापासून ते मोठ्यापर्यंत सर्वांना सोशल मीडियाचे फार वेड लागले आहे. रोजच्या जीवनात सोशल मीडियाचा वापर करुन प्रत्येकाने त्याला आपली मूलभूत गरज बनवून घेतली आहे. त्यात काही तरुण जीवाची पर्वा न करता रिल्स (Relss)बनवताना दिसतात मात्र याच नादात अनेकांना जीव गमवावा लागला आहे.('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

त्यात सोशल मीडियावर एका तरुणीचा समुद्रातील व्हिडिओ व्हायरल होत आहे,ज्यात महिलेचा अतिउत्साह तिला कशा प्रकारे नडला आहे ते समजते तसेच हा व्हिडिओ पाहून प्रत्येकजण समुद्रात किंवा पाण्यासंबंधित अन्य ठिकाणी कोणतही धाडस करताना दहा वेळा विचार कराल.

व्हायरल व्हिडिओत, एक समुद्र आहे त्या समुद्रात आपल्याला भल्या मोठ्या समुद्री लाटा उसळताना दिसत आहेत. दरम्यान एक तरुणी समुद्रातील किनाऱ्यावर असलेल्या दगडावरून खाली उतरुन समुद्रात फोटोशूट करण्यासाठी जाते. तिच्या खाली अतंरावर फोटोशूट (Photoshoot) करणारा व्यक्ती असतो.

ज्या क्षणी ती हळू हळू पाण्याचा आनंद लुटण्यासाठी पाण्यात जाते तेव्हा तरुणीला पाण्याचा अंदाज न लागल्याने ती समुद्रात जाते पण तरुणी उठण्याचा प्रयत्नात असते तेव्हा एक मोठी लाट येते आणि तिला आत खेचून घेते. तरुणी सोबत असलेला तरुण तिच्या मदतीसाठी पुढे जातो मात्र काही क्षणात तरुणी दिसेनाशी होते.

@FAFO_TV या एक्स सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हिडिओ पोस्ट करण्यात आला आहे. नेमका व्हिडिओ कुठला आहे हे समजू शकलं नसून तरुणीची माहिती समजू शकलेली नाही.व्हिडिओ व्हायरल होताच अनेक स्तरातून नेटकऱ्यांच्या विविध प्रतिक्रिया येत आहेत. व्हिडिओला ४० हजाराहून लाईक्स मिळाले असून लाखोंच्या घरात व्ह्यूज मिळत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gold Rate Today: सोनं खरेदीची सुवर्णसंधी! १ तोळा सोन्याचे दर किती? वाचा 18k- 22k आणि 24k चे आजचे दर

Maharashtra News Live Update :रायगडात महायुतीमध्ये खटके सुरूच, दळवी आणि तटकरे यांच्यात जुंपली

Phone battery: प्रत्येकवेळी मोबाईल 100% चार्ज करणं योग्य आहे का?

Eknath Shinde : महाराष्ट्रात घडामोडींना वेग! एकनाथ शिंदे थेट दिल्लीत; मोदींच्या भेटीनंतर राजकारणाला नवी दिशा मिळणार?

RBI Repo Rate: तुमचा हप्ता पुन्हा महाग होणार? RBI च्या बैठकीतून समोर आली धडकी भरवणारी बातमी

SCROLL FOR NEXT