Barabanki Viral Video: उत्तर प्रदेशातील बाराबंकी जिल्ह्यातील एका अत्यंत दु:खद आणि हादरवून टाकणाऱ्या घटनेने सर्वत्र खळबळ उडवली आहे. जिथे एका १२ वर्षीय विद्यार्थ्याचा शाळेच्या गेटपर्यंत पोहोचण्यापूर्वीच अचानक मृत्यू झाला. ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली असून, त्यामध्ये मुलाला शाळेच्या गेटजवळ अचानक बेशुद्ध होऊन पडताना पाहायला मिळतं.
ही घटना नक्की कधी घडली याबाबत समजू शकले नाही. पण घडले की, दररोजप्रमाणे ही विद्यार्थी सकाळी शाळेत(School) जायला निघाली होती. मात्र शाळेच्या गेटजवळ येताच तो अचानक चक्कर येऊन खाली कोसळला. काही क्षणांनंतर तिथे उपस्थित लोकांनी तिच्याकडे धाव घेतली आणि तात्काळ तिला जवळच्या रुग्णालयात नेण्यात आलं. मात्र, डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर तिला मृत घोषित केलं.
सध्या या घटनेचा सीसीटीव्ही व्हिडिओ(Video) सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. या सीसीटीव्ही व्हिडिओमध्ये, तो मुलगा गाडीमधून उतरुन शाळेच्या गेटकडे निघाला होता. पण काही सेकंदांतच ती बेशुद्ध होऊन खाली कोसळते. आजूबाजूचे काही विद्यार्थी आणि शिक्षक धावत तिच्या मदतीसाठी जातात, पण तोपर्यंत फार उशीर झालेला असतो.
या विद्यार्थिनीच्या मृत्यूने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. शाळा प्रशासन, पालक वर्ग आणि स्थानिक नागरिक यांना अजूनही हा धक्का पचवता आलेला नाही. सुरुवातीला अनेकांना वाटलं की तिला ऊन्हामुळे चक्कर आली असेल, पण काही वेळातच तिचा मृत्यू झाल्याचं स्पष्ट झाल्यानंतर सर्वच चक्रावून गेले.
टीप : हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.