चाँद नवाबनंतर आणखी एक पाकिस्तानी पत्रकार चर्चेत! समुद्राच्या खोलीचं रिपोर्टिंग करताना थेट समुद्रात मारली उडी

Pakistani Journalist Sea: चाँद नवाबनंतर आणखी एक पाकिस्तानी पत्रकार चर्चेत आला आहे. समुद्राच्या खोलीचं प्रत्यक्ष दाखवण्यासाठी त्याने थेट समुद्रात उडी मारली. त्याचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून नेटकऱ्यांकडून मजेशीर प्रतिक्रिया मिळत आहेत.
Pakistani Journalist Sea
Pakistani reporter dives into the sea mid-report to demonstrate water depth; video goes viral on social mediaSaam Tv
Published On

Funny Reporter Video: पाकिस्तानातील पत्रकारिता अनेकदा त्यांच्या वेगळ्या आणि थेट शैलीसाठी चर्चेत राहते. सोशल मीडियावर चाँद नवाब या पत्रकाराचा प्लॅटफॉर्मवरुन केलेलं रिपोर्टिंग आजही लोक विसरलेले नाहीत. आता पुन्हा एकदा अशाच प्रकारचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे ज्यामध्ये एक पाकिस्तानी पत्रकार थेट समुद्रात उडी मारून रिपोर्टिंग करताना दिसत आहे.

थेट पाण्यात उतरून रिपोर्टिंग!

व्हायरल(Viral) व्हिडीओमध्ये, दिसणारा पत्रकार एका पाकिस्तानी चॅनेलसाठी काम करत असावा, असं अंदाजाने म्हटलं जातंय. तो समुद्राच्या काठावर उभा राहून रिपोर्टिंग करताना म्हणतो की, ''ये है समुंदर की गहराई...''आणि अचानक त्यानंतर तो आपल्या कपड्यांसह थेट पाण्यात उडी मारतो. काही क्षणांनंतर तो डोकं वर काढतो आणि मोठ्या उत्साहात बोलतो, "देखिए, पानी की गहराई कितनी ज्यादा है''

या प्रकारामुळे त्याचं रिपोर्टिंग सध्या इंटरनेटवर प्रचंड चर्चेत आहे. त्याची शैली, आत्मविश्वास पाहून अनेकांनी दाद दिली आहे, तर काहींनी विनोद करून त्याची तुलना थेट चाँद नवाबशी केली आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावरील प्रत्येक प्लॅटफॉर्मवर व्हायरल होत आहे.

सोशल मीडियावर प्रतिक्रियांचा पूर

या पत्रकाराचा व्हिडीओ(Video) सोशल मीडियावर येताच नेटकऱ्यांनी भन्नाट प्रतिक्रिया द्यायला सुरुवात केली. काहींनी म्हटलं की,"हा पत्रकार नाही, स्टंटमॅन आहे!" तर काहींनी त्याच्या आत्मविश्वासाची प्रशंसा केली असून काहींनी युजर्सनी मजेशीर मीम्स बनवून लिहिलं, "Breaking news''. आतापर्यंत या व्हिडीओला हजारो शेअर्स, लाईक्स आणि कमेंट्स मिळाल्या आहेत.

टीप : हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

Pakistani Journalist Sea
गाडीच्या चाकाखाली आला चिमुकला; आईच्या किंचाळ्या ऐकून काळीज हादरेल

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com