Saam Tv
व्हायरल न्यूज

बापरे! घराबाहेर नाही, तर थेट बेडवर झोपले असतानाच अचानक कोब्रा समोर; थरकाप उडवणारी घटना कॅमेऱ्यात कैद

Shocking Snkae Video: मध्य प्रदेशातील सिवनी जिल्ह्यात घरात गादीखाली विषारी नाग सापडल्याची धक्कादायक घटना घडली. वेळीच लक्ष गेल्याने मोठा अनर्थ टळला. नागाला सुरक्षितपणे पकडून जंगलात सोडण्यात आले आहे.

Tanvi Pol

MP Viral Video: मध्य प्रदेशातील सिवनी जिल्ह्यातून अंगावर शहारा आणणारी घटना समोर आली आहे. जिथे एका घरात गादीखाली अचानक विषारी नाग सापडल्याने संपूर्ण परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं. ही घटना एवढी धक्कादायक होती की ज्यानेही हे पाहिलं त्याचा थरकाप उडाला. घरातील सदस्य एकदम हादरून गेले, परंतु सुदैवाने वेळेत लक्ष गेल्याने मोठा अनर्थ टळला.

गादीखाली हालचाल, अनपेक्षित दृश्य

सिवनी जिल्ह्यातील एका रहिवासी भागातील ही घटना आहे. नेहमीप्रमाणे घरातील सदस्य आपापल्या कामात व्यस्त होते. संध्याकाळच्या वेळी, झोपायला जाण्यापूर्वी बिछाना लावत असताना एका सदस्याला गादीखाली काहीतरी हालचाल जाणवली. सुरुवातीला उंदीर असल्याची शंका आली, पण पुढचा क्षण त्यांच्या अंगावर काटा आणणारा ठरला. गादी उचलताच त्यांना एक मोठा आणि काळसर रंगाचा विषारी नाग(Snake) दिसला. एक क्षणासाठी ते हादरलेच

घरात एकच गोंधळ, भीतीचं वातावरण

नाग पाहताच घरातील सदस्यांनी जोरजोराने आरडा-ओरडा सुरू केला. लहान मुले दुसऱ्या खोलीत होती, त्यांना तात्काळ सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलं. घरात अफरातफरीचं वातावरण निर्माण झालं. कुटुंबातील मुखिया यांनी त्वरित सर्पमित्रला फोन करून मदतीची विनंती केली.

सर्पमित्रांचा त्वरित प्रतिसाद

सर्पमित्राने काही मिनिटांतच घटनास्थळी हजर होत संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेतला. त्यांनी सर्वप्रथम घरातील सदस्यांना सुरक्षित अंतरावर ठेवून शांत राहण्यास सांगितले. त्यांनी त्या नागाला अत्यंत काळजीपूर्वक गादीखालून बाहेर काढलं. हा नाग कोब्रा प्रजातीचा असल्याचं त्यांच्या निरीक्षणात आलं. कोब्रा हा अत्यंत विषारी साप असून त्याचा दंश प्राणघातक ठरू शकतो. सुदैवाने, कुणालाही इजा झाली नाही आणि नागालाही कोणतीही हानी झाली नाही.

टीप: हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ind Vs Eng Lord Test : जे सचिन-विराटला जमलं नाही, ते केएल राहुलनं करुन दाखवलं, पठ्ठ्यानं लॉर्ड्सचं मैदान गाजवलं

जगात मुस्लीम लोकसंख्येचा विस्फोट,भारत होणार लोकसंख्येत मोठा मुस्लीम देश? देशात हिंदू लोकसंख्या किती?

मुंडेंच्या तिसऱ्या लेकीची राजकारणात एन्ट्री, यशश्री मुंडे राजकारणाच्या मैदानात,यशश्री लढवणार वैद्यनाथ बँकेची निवडणुक

Maharashtra Politics: राऊतां विरोधात शिरसाटांनी ठोकला शड्डू,'बदनामीसाठी मॉर्फ व्हिडीओ', शिरसाटांचा दावा,'पैशांच्या बॅगेचे आणखी व्हिड़िओ बाहेर काढू

Maharashtra Politics: शिलेदारांनी वाढवल्या शिंदेंच्या अडचणी?आपल्याच नेत्यांमुळे शिंदे चक्रव्युहात? खोतकर, शिरसाटांसह गायकवाडही अडचणीत

SCROLL FOR NEXT