धावत्या रेल्वेच्या दारात स्टाईल मारत होती तरुणी; आई आली अन् धू धू धूतले; VIDEO VIRAL

Girl Slapped By Mother: सोशल मीडियावर प्रसिद्ध होण्यासाठी ट्रेनच्या दरवाजात उभी राहून रील करणाऱ्या तरुणीला आईने कानशिलात देत चांगला धडा शिकवला. हा प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला असून व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जबरदस्त व्हायरल झाला आहे.
Girl Slapped By Mother
Moment caught on camera: Mother slaps daughter filming a reel on train door; netizens react to viral parenting clipSaam Tv
Published On

Dangerous Train Videos: आजच्या डिजिटल युगात सोशल मीडियाची क्रेझ इतकी वाढली आहे की, बरेच तरुण-तरुणी आपल्या आयुष्यातील प्रत्येक क्षण कॅमेऱ्यात कैद करत असतात. यामध्ये अनेकजण चांगल्या कंटेंटच्या शोधात धाडसी स्टंट्स, रील्स किंवा भन्नाट व्हिडिओ बनवत असतात. परंतू, या नादात सुरक्षिततेचा पूर्णत विसर त्यांना पडतो. सध्या असाच एक धक्कादायक आणि थोडक्यात विनोदी प्रकार सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.

या व्हायरल(Viral) व्हिडिओमध्ये, एक तरुणी ट्रेनच्या दारात उभी राहून रील शूट करताना दिसते. तिच्या चेहऱ्यावर आत्मविश्वास आणि एक प्रकारचा ग्लॅमर झळकत असतो. ती कॅमेऱ्याकडे पाहत पोझ देते. मात्र, तिचं हे ''स्टाइलिंग'' फार वेळ टिकत नाही. काही क्षणातच तिच्या मागून तिची आई येते आणि तिच्या कानशिलात बसवते. एकदम अनपेक्षित असा हा क्षण पाहणाऱ्यांना आधी धक्का देतो आणि नंतर हसूही येतं.

आजकाल रील्स बनवण्यासाठी तरुणाई वेगवेगळ्या पद्धतीने अतरंगी प्रकार करत असते. ट्रेनच्या दारात उभं राहणं, ट्रॅकवर चालणं, धोकादायक स्टंट्स करणं हे सर्व केवळ काही सेकंदांच्या प्रसिद्धीसाठी केलं जातं. मात्र, याचा धोका किती मोठा असू शकतो, याची जाणीव या व्हिडिओमुळे झाली आहे.

ट्रेनमधील हा व्हिडिओ(VIDEO) इन्स्टाग्रामवरील mr_rahul_razz या अकाउंटवर अपलोड करण्यात आलेला असून हे प्रकरण पाहिल्यानंतर नेटकरी वर्गातून अनेक प्रतिक्रियाही आलेल्या आहेत. एका यूजरने म्हटलं की,''आईती आईच असते'' दुसऱ्या यूजरने म्हटलं,''काकूंनी अजून मारायला पाहिजे होत''अशा अनेक प्रतिक्रिया आलेल्या आहेत.

टीप: हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

Girl Slapped By Mother
Shocking Stunt: वेडेपणाची हद्द! डोंगराच्या कड्यावर तरुणीचा जीवघेणा स्टंट, व्हिडिओ पाहून अंगावर शहारे येतील

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com