Lahore High Court saam tv
व्हायरल न्यूज

Viral Video: हायकोर्ट आहे की कुस्तीचा आखाडा? पुरूष वकिलाची महिला वकिलाला लाथा-बुक्क्यांनी मारहाण, व्हिडीओ व्हायरल

Lahore High Court: पाकिस्तानातील लाहोर उच्च न्यायालयात बार असोसिएशन निवडणुकीदरम्यान वकिलांमध्ये मारामारी झाल्याचा धक्कादायक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

Surabhi Jayashree Jagdish

सोशल मीडियावर सध्या एक धक्कादायक व्हिडिओ व्हायरल होताना दिसतोय. या व्हिडीओमध्ये पाकिस्तानातील लाहोर उच्च न्यायालयात काही वकील आपसात मारामारी करताना दिसतायत. न्यायालयाच्या आवारात घडलेली ही घटना पाहून अनेकजण हैराण झालेत. कायद्याचे रक्षक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वकिलांचं हे कृत्य पाहून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसलाय.

काय आहे नेमका प्रकार?

माहितीनुसार, हा प्रकार लाहोर हाय कोर्ट बार असोसिएशनच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर घडलाय. लाहोर हाय कोर्ट हार असोसिएशनच्या निवडणुकीदरम्यान दोन गटांमध्ये तणाव वाढलेला होता.

हा तणाव इतका टोकाला पोहोचला की, वाद थेट हाणामारीपर्यंत पोहोचला. सुरुवातीला एका पुरुषामध्ये आणि महिला वकिलामध्ये शाब्दिक वाद झाल्याची माहिती आहे. त्यानंतर काही मिनिटांतच या वादाचं रूपांतर हाणामारीमध्ये झाल्याचं दिसून येतंय.

सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल

या व्हिडीओमध्ये महिला वकील पंख्याचा तुटलेला भाग उचलून पुरुष वकिलाला मारताना दिसतेय. वकिलाला लागल्यानंतर तो रागाने तिच्यावर हल्ला करताना दिसतोय. महिला वकील स्वतःचा बचाव करण्याचा प्रयत्न करते, मात्र तो पुरुष वकील तिला मारायचं थांबवत नाही. या सर्व प्रकारादरम्यान न्यायालय परिसरात मोठा गोंधळ झाल्याचं व्हिडिओत स्पष्टपणे दिसून येतंय.

विशेष म्हणजे, त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या लोकांनी भांडण सोडवण्याऐवजी संपूर्ण प्रकरण मोबाईलमध्ये शूट केलंय. यामुळे सोशल मीडियावर विविध प्रतिक्रिया उमटल्या आहेत. एका युजरने लिहिलंय की, 'हे आहे पाकिस्तानच्या न्यायालयाचे खरं चित्र आहे.' तर दुसऱ्या एका युजरने म्हटलंय की, 'पाकिस्तानमध्ये काहीही घडू शकतं.' अनेकांनी न्यायालयाच्या परिसरात अशी घटना कशी घडू शकते त्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे.

(डिस्क्लेमर- हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये किती तथ्य आहे याची खातरजमा आम्ही करत नाही.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Iran Supreme Leader: इराणचे नवीन सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांची संपत्ती किती?

Govinda: 'गोविंदाचं करियर यामुळे खराब झालं...'; या प्रसिद्ध अभिनेत्रीने केला धक्कादायक खुलासा

Maharashtra Live News Update: सिंधुदुर्गात ऐन उन्हाळ्यात दाट धुक्याची चादर

Chanakya Niti : झटपट श्रीमंत व्हायचंय? चाणक्यांच्या 'या' टिप्स लक्षात ठेवा, कधीच कंगाल होणार नाही

...तरच भाजप राज्यसभेसाठी ५ वा उमेदवार देणार, शरद पवारांसोबत कनेक्शन; देवेंद्र फडणवीसांचा मास्टरप्लान काय?

SCROLL FOR NEXT