Violent altercation between patient’s relatives inside Buldhana hospital ward; viral video sparks outrage online Saam Tv
व्हायरल न्यूज

बायकोवर उपचार, रुग्णालयात सख्ख्या भावासोबत नवऱ्याची फ्री स्टाईल हाणामारी

Buldhana Hospital Fight: बुलढाणा जिल्हा रुग्णालयात महिला रुग्णाच्या नातेवाईकांमध्ये तुफान हाणामारी झाली. पती आणि भावामध्ये वाद होऊन वार्डातच मारहाण झाली. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.

Tanvi Pol

Maharashtra news: बुलढाणा जिल्हा सामान्य रुग्णालयात एक धक्कादायक प्रकार घडला. भरती असलेल्या एका महिला रुग्णाच्या नातेवाईकांमध्ये अचानक वाद झाला आणि पाहता पाहता हा वाद तुंबळ हाणामारीत बदलला. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर झपाट्याने व्हायरल होत असून, रुग्णालय प्रशासन आणि सुरक्षेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत.

घटनेचा प्रकार काय?

सदर महिला रुग्ण काही दिवसांपासून रुग्णालयाच्या वार्ड क्रमांक ५ मध्ये उपचार घेत होती. दरम्यान पतीसह तिचे भाऊ रुग्णालयात तिला पाहण्यासाठी आले होते. यावेळी काही वैयक्तिक कारणांवरून या नातेवाईकांमध्ये बाचाबाची झाली. काही क्षणांतच वातावरण चिघळले आणि दोघांत हातघाईची मारामारी सुरू झाली. या प्रकारामुळे रुग्णालयात उपस्थित कर्मचाऱ्यांमध्ये एकच गोंधळ उडाला. काही रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक घाबरून रुग्णालयाबाहेर धावू लागले. हाणामारी इतकी गंभीर होती की, वॉर्डमधील काही खाटा हलवल्या गेल्या, काही वैद्यकीय साहित्य खाली पडले आणि उपचारात व्यत्यय निर्माण झालारुग्णालयातील कर्मचाऱ्यांमध्ये घबराट

रुग्णालयातील कर्मचाऱ्यांमध्ये घबराट

या हाणामारीने डॉक्टर, परिचारिका आणि इतर कर्मचाऱ्यांमध्ये प्रचंड अस्वस्थता निर्माण झाली. सुरक्षेअभावी त्यांचं काम करताना काय होईल याची चिंता सगळ्यांनाच वाटू लागली. एक परिचारिका म्हणाली,"अशा घटनांमुळे आम्ही भीतीच्या छायेत काम करत आहोत. वारंवार अशा भांडणांचे प्रकार वाढत असून रुग्णालयात सुरक्षा रक्षकांची संख्या अपुरी आहे".

व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

घटनेदरम्यान वॉर्डमध्ये उपस्थित असलेल्या एका रुग्णाच्या नातेवाईकाने मोबाईलवर संपूर्ण प्रकार मोबाईलमध्ये कैद केला. त्यानंतर तो व्हिडिओ(VIDEO) फेसबुक, व्हॉट्सअ‍ॅप, इंस्टाग्रामसह विविध सोशल मीडियावर वेगाने पसरला आहे. या व्हिडिओमध्ये दोघे तरुण एकमेकांना ढकलताना, शिवीगाळ करताना आणि एकमेकांवर हात उचलताना स्पष्टपणे दिसत आहेत.

टीप: हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Police Officers Promotion: राज्यातील १५० पेक्षा अधिक पोलीस अधिकाऱ्यांच्या पदोन्नतीचे आदेश; वाचा संपूर्ण लिस्ट

Bogus Voter Scam: राहुल गांधींकडून पुराव्यांसह बोगस मतदारांचा भांडाफोड; सांगितली नोंदणीची मोडस ऑपरेंडी

Vantara:'माधुरी'नंतर वनताराचा 'गौरी'वर डोळा? गौरी हत्तीणीसाठी 3 कोटींची ऑफर?

Shocking : महाराष्ट्र हादरला! ७ वर्षीय विद्यार्थिनीवर शिक्षकाकडून अत्याचार, पालकांमध्ये संताप

Kharadi Rave Party: जावई खेवलकरांच्या मोबाईलमध्ये अश्लील व्हिडिओ फोल्डर, चाकणकरांच्या आरोपांनंतर सासरे खडसेंचा पारा चढला

SCROLL FOR NEXT