Seema Haider Social Media x
व्हायरल न्यूज

Viral:भारत-पाकिस्तानमध्ये कोणती सीमा? विद्यार्थ्यांचं उत्तर वाचून मास्तरही चक्रावले

Seema Haider : सीमा हैदर नाव कोणाला माहिती नाही असं होणार नाही. सीमा हैदरची प्रेमकथा अख्या देशभरात गाजल्याने तिच नाव सर्वांना परिचीत झालं आहे. गेल्या काही दिवसांपासून सीमा हैदरचं नाव चर्चेतून दूर सारलं गेलं होतं. परंतु आता एका प्रकरणामुळे सीमा हैदरचं नाव चर्चेत आले आहे.

Bharat Jadhav

India-Pakistan Border Student Answer viral On Social Media:

पाकिस्तानी सीमा हैदर भारतातील अनेकांना परिचीत असलेलं नाव झालेलं आहे. सीमा हैदरनं भारतात येत तिचा प्रियकर सचिन मीनाशी लग्न केलं. त्यानंतर सगळीकडे सीमाची चर्चा सुरू झाली. गेल्या काही दिवसांपासून सीमा हैदर आणि सचिन मीना याच्या नावाची चर्चा दूरपर्यंत नव्हती. परंतु नुकत्याच एका शाळेत घडलेल्या प्रकरणामुळे सीमा हैदरची चर्चा पुन्हा एकदा सुरू झालीय. (Latest News)

पाकिस्तानची सीमा (Pakistan Border) ओलांडून आलेल्या या सीमामुळे शाळकरी (Student) मुलं भारत-पाकिस्तानमधील सीमा (Border) विसरले आहेत. दोन्ही देशातील सीमा विद्यार्थ्यांच्या डोक्यात राहिली नसल्याने सीमा हैदर एकादा चर्चेत आली. त्याचं झालं असं राजस्थानमधील एका शाळेतील परीक्षेत एका विद्यार्थ्यांनी आपल्या उत्तरपत्रिकेत (answer sheet) उत्तर म्हणून चक्क सीमा हैदरचं नाव घेतलं.

त्याचं झालं असं राजस्थानमधील एका शाळेतील परीक्षेत एका विद्यार्थ्यांनी आपल्या उत्तरपत्रिकेत उत्तर म्हणून चक्क सीमा हैदरचं नाव घेतलं. या विद्यार्थ्याची उत्तरपत्रिका सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. दरम्यान हा प्रकार घडलाय राजस्थानमधील धौलपुर जिल्ह्यातील एका शाळेत. या शाळेत बारावीच्या परीक्षेत विज्ञानच्या प्रश्नपत्रिकेत भारत आणि पाकिस्तानच्या सीमेबाबत एक प्रश्न विचारण्यात आला होता.

भारत आणि पाकिस्तान मधील सीमा नेमकी काय आहे आणि ती किती लांब आहे, असा प्रश्न विद्यार्थ्यांना विचारण्यात आला होता. याच उत्तर देताना एका विद्यार्थ्यांना चक्क सीमा हैदरचं नाव उत्तर म्हणून लिहिलं. इतकेच नाही तर तिची उंची सुद्धा त्याने आपल्या इतरात लिहिलीय. भारत आणि पाकिस्तानच्यामध्ये असलेल्या सीमेला सीमा हैदर म्हटलं जातं. तिची उंची ५ फूट ६ इंच आहे, असं उत्तर विद्यार्थ्यांने आपल्या उत्तर पत्रिकेत लिहिलं आहे. विद्यार्थ्याने दिलेले हे उत्तर ऐकून शिक्षक चक्रावले आहेत. विद्यार्थ्यांचे हे उत्तर सोशल मीडियावर व्हायरल होतं आहे.

पेपरमध्ये ज्या विद्यार्थ्यानं हे अतरंगी उत्तर लिहिलं आहे त्या विद्यार्थ्याचं नाव आहे या विद्यार्थ्याच्या उत्तरानंतर सोशल मीडियावर चांगली चर्चा होत आहे. या उत्तरपत्रिकेतील उत्तरावर लोकं मोठ्या प्रमाणात कमेंट करताना दिसत आहेत.

भारत-पाकिस्तानमधील सीमा रेषा

भारत आणि पाकिस्तानमधील सीमारेषा किती लांबीची आहे. याचं उत्तर आम्ही देतो. एलओसी ही ३३२३ किलोमीटर लांबीच्या भारत-पाकिस्तान सीमेचा एक भाग आहे. जम्मूच्या चिनाब नदीच्या दक्षिणेकडील मुनव्वर येथून सुरू होणारी उजवीकडे सियाचेन ग्लेशियरच्या बेसपर्यंतची (एनजे ९८४२ ) ७४० किमीची सीमारेषा प्रत्यक्ष नियंत्रण रेषा (एलओसी) आहे. उर्वरित २४७४ किमीच्या सीमेला आंतरराष्ट्रीय सीमारेषा म्हटलं जातं.

जम्मू-काश्मीरमध्ये १२२५ किलोमीटर लांबीची सीमा असून यातील ७४० किलोमीटर नियंत्रण रेषा (LOC) आहे. राजस्थानमध्ये १०३७ किलोमीटर लांबीची आंतरराष्ट्रीय सीमा आहे. तर गुजरातमध्ये ५०८ किलोमीटर लांबीची सीमा आहे. पंजाबमध्ये ५५३ किलोमीटर आणि जम्मू-काश्मीरमध्ये ७४० 0 किलोमीटर लांबीची नियंत्रण रेषा आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

छत्रपती शिवराय आणि संभाजी महाराजांनी 16 भाषा शिकून चूक केली का? संजय गायकवाड नेमकं काय म्हणाले?

Pune Crime : पुण्यात पुन्हा सैराट! प्रेमविवाह केल्याचा प्रचंड राग, सेटर लावून सलूनच्या दुकानात घुसून जीवघेणा हल्ला

Bullet Train प्रकल्पाचे काम सुस्साट, BKC स्टेशनचे काम ८० टक्के पूर्ण; NHSRCLची मोठी माहिती

Pune Crime : पंढरीला जाताना वारकऱ्यांना लुटलं, मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपींना पकडतानाचा थराराक CCTV

Pune Tourism : रिमझिम पाऊस अन् पांढराशुभ्र धबधबा, पुण्यात लपलंय अद्भुत सौंदर्य

SCROLL FOR NEXT